Headlines

chandrashekhar bawankule alligation on congress bharat jodo yatra spb 94

[ad_1]

सोमवारी रात्री तेलंगणाच्या देगलूरमधून काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांनी या यात्रेचं स्वागत केले. दरम्यान, आता या यात्रेच्या निमित्ताने भाजपाने काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. या यात्रेसाठी लागणारा खर्च महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षात भ्रष्टाचारातून कमावलेला पैशातून होत असल्याचा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानकुळे यांनी केला आहे.

हेही वाचा – भारत जोडो यात्रेतील ऊर्जेमुळे महाराष्ट्रातील मरगळलेल्या काँग्रेसमध्ये चैतन्य

चंद्रशेखर बावनकुळेंचे काँग्रेसवर आरोप

“महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेचा प्रवेश झाला आहे. या यात्रेत मोठ्या नेत्यांनी त्यांच्या मुलांना समोर केले आहे. यासाठी खर्च होणारा पैसा नेमका कोणाच्या खात्यातून खर्च होतो आहे? केंद्रीय काँग्रेसच्या खात्यातून खर्च होतोय की महाराष्ट्र काँग्रेसच्या खात्यातून खर्च होतो आहे? हा पैसा जो खर्च होतो आहे, तो अडीच वर्षात महाविकास आघाडीने भ्रष्टाचारातून कमावलेल्या पैशांमधून होतो आहे. सरकारमधून भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारातून सरकार हा काँग्रेसचा नेहमीचा अजेंडा आहे”, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

“काँग्रेसची भारत जोडो यात्रा बघितली, तर या यात्रेत नेत्यांच्या मुलांना समोर केले जात आहे. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज आहेत. अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश घेत आहेत. नंदुरबार, भिवंडी, मिरा-भाईंदर, ठाणे येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. राहुल गांधीसारखे नेते महाराष्ट्रात असताना काँग्रेसचे खालचे कार्यकर्ते भाजपात का प्रवेश करत आहेत? याचे आत्मचिंतन काँग्रेसने केले पाहिजे”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “शॅडो सीएम अजित पवार शांतच”, सुप्रिया सुळे-अब्दुल सत्तार वादावर मनसेचा सवाल; म्हणे, “दया, कुछ तो गडबड है!”

काँग्रेसचे बावनकुळेंना प्रत्त्युतर

“ही भारत जोडो यात्रा आहे, ही महाराष्ट्र जोडो यात्रा नाही. चंद्रशेखर बावनकुळे हे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मंत्री आणि एका महत्त्वाच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना हे वक्तव्य शोभत नाही. ज्या यात्रेच्या नावात भारत जोडो असा शब्द आहे आणि राहुल गांधींनी ज्या उद्देशाने ही यात्रा सुरू केली आहे, ते सर्वांनाच माहिती आहे. देशात आज बेरोजगारी, महागाई वाढली आहे. गोरगरीबांना, तरूणांना न्याय मिळावा, या उद्देशाने ही यात्रा काढण्यात आली आहे. बावनकुळेंनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलणं म्हणजे चेष्ठा आहे. राफेलपासून जीएसटीपर्यंत अनेक प्रकरणं आहेत, ज्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत”, असे प्रत्युत्तर काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी दिले आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *