Headlines

आव्हानात्मक “डेक्कन क्लिफ हँगर” सायकलिंग स्पर्धेत बार्शीचे नाव झळकणार

पुणे – शनिवार दि.२६ नोव्हेंबर पासून पुणे ते गोवा ” द डेक्कन क्लिफ हँगर” या देशभरात नावाजलेल्या व आव्हानात्मक सायकल स्पर्धेत बार्शी सायकलिंग क्लब चे पद्माकर कात्रे, चंद्रकांत बारबोले,अजित मिरगणे व सूरज मुंढे यांचा सहभाग असणार आहे.या चौकडीने केलेल्या मेहनत व सरावाच्या जोरावर बार्शी शहराचे नाव या स्पर्धेत झळकणार आहे.

अशी असणार ही स्पर्धा- “द डेक्कन क्लिफ हँगर” या सायकलिंग स्पर्धेची ९ वी आवृत्ती शनिवार दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ६:०० वाजता पुणे येथील केशवबाग, डी. पी. रोड येथून सुरू होणार आहे .”द डेक्कन क्लिफ हँगर”हा देशातील प्रसिद्ध अल्ट्रा सायकलिंगचा इव्हेंट आहे.६४३ कि.मी.ची ही स्पर्धा दख्खन च्या पठरापासून कोकणात उतरते.

महाबळेश्वर च्या उंच पर्वत रांगा, आंबोली घाटातील घनदाट जंगलातून उतरून गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर समारोप होतो..६४३ कि.मी. च्या या अंतरात वातावरणातील व भूप्रदेशाची विविधता, अवघड घाट अनेक आव्हाने उभे करत असते.

हया स्पर्धेतून होणारं अमेरिकेतील स्पर्धेतील स्पर्धकांची निवड – रेस ॲक्रॉस अमेरिका या अमेरिकेत होणाऱ्या ४८०० कि.मी. च्या स्पर्धेत निवड होण्यासाठी सायकलपटू ना ६४३ कि. मी.अंतर विना थांबा ३२ तासाच्या आत पूर्ण करणे आवश्यक असते. सहभागी सायकलपटू ना सहकार्य करण्यासाठी त्यांचे सहकारी वाहनात असतात .

देशभरातून सायकलपटुंचा सहभाग– देशातील महाराष्ट्र, प.बंगाल,उत्तर प्रदेश,कर्नाटक,छतीसगड ,गुजरात अश्या अनेक राज्यातून सायकलपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

स्पर्धेच्या माहितीसाठी – पुण्यातील इन्स्पायर इंडिया ही स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनी या सर्व उपक्रमाचे व्यवस्थापन करत आहे..या स्पर्धेची संपूर्ण माहिती https://www.inspireindia.net.in/deccan.cliffhanger या संकेत स्थळावर उपलब्ध आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *