Headlines

चाहत्यांसाठी बॉडीगार्डशी भिडला Nawazuddin Siddiqui; अभिनेता हवा तर असा!

[ad_1]

मुंबई : बॉलिवूड अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी यानं कायमच विविध मार्गांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नवाझनं असं करत असताना एक अभिनेता म्हणून प्रसिद्ध होण्यासोबतच एक व्यक्ती म्हणूनही समाजात मानाचं स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं. बरं, तो या यशस्वीसुद्धा झाला. (Bollywood Nawazuddin Siddiqui)

चित्रपटांच्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात आल्यानंतरही यशाच्या शिखरावर असणाऱ्या या अभिनेत्यानं साधेपणाची कास कधीच सोडली नाही. त्याच्या वागण्याबोलण्यातील हाच साधेपणा दर दिवसागणिक त्याच्या लोकप्रियतेत भर टाकताना दिसत आहे. 

सध्या नवाझचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. जिथं नवाझला पाहताच त्याचे चाहते सेल्फी घेण्यासाठी त्याच्याभोवती गराडा घालतात. 

एका रेस्तराँमधून बाहेर आलं असता नवाझ आल्याचं कळताच त्याचे चाहते तिथं आले आणि त्यांनी आवडीच्या अभिनेत्यासोबत फोटो काढावा यासाठी म्हणून नवाझभोवती गर्दी केली. यावेळी त्याच्या बॉडीगार्डनं चाहत्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. 

चाहत्यांना हातानं मागे करणाऱ्या बॉडीगार्डला पुढे खुद्द नवाझनंच अडवत त्याचा हातही मागे केला. त्यानं चाहत्यांना फोटो काढू दिला आणि त्यानंतर तोच पुढे गेला. 

पुढच्याच मिनिटाला याची पुनरावृत्ती झाली आणि नवाझ पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांसाठी बॉडीगार्डशी भीडताना दिसला. अर्थात त्याचं हे भिडणं गंबीर स्वरुपाचं नव्हतं. पण, अतोनात प्रेम करणाऱ्या ज्या चाहत्यांनी आपल्याला आज इतकं लोकप्रिय केलं त्याच चाहत्यांसाठी आपणही काहीतरी केलं पाहिजे, याची त्याला असणारी जाणीव सर्वांची मनं जिंकून गेली. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *