चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्रीची पतीच्या मृत्यूनंतर दुर्दशा; पाहून डोळे पाणावतील


मुंबई : जीवनाच्या प्रवासात अशी काही वळणं येतात ज्यावेळी या वळणांवर आपली खरी परीक्षा घेतली जाते. बॉलिवूडमध्ये असेच दिवस एका अभिनेत्रीच्या नशिबी आले. लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या या अभिनेत्रीसोबत असं काही घडेल याची तिनं अपेक्षाही केली नसावी. (Bollywood Actress )

मादक अभिनेत्री म्हणून एक काळ गाजवणारी ही सौंदर्यवती आहे, झिनत अमान. ‘सत्यम शिवम् सुन्दरम’, ‘डॉन’, ‘धरमवीर’, ‘हरे रामा-हरे कृष्णा’, ‘कुर्बानी’ अशा चित्रपटांमुळे प्रेक्षकांच्या मनाचा ठाव झिनत यांनी घेतला. (zeenat aman )

निर्माते मजहर खान यांच्याशी त्यांनी लग्न करत सहजीवनाची सुरुवात केली. हे नातं जगत असताना आपलं आयुष्य नेमकं कसं होतं, याचा खुलासा त्यांनी एका मुलाखतपर कार्यक्रमात केला होता. 

झिनतनं चित्रपटांमध्ये काम करावं असं मजहर यांना मुळीच वाटत नव्हतं. या कारणामुळं त्यांच्यामध्ये सतत वाद होत होते. या वादांतच 1993 मध्ये मजहर यांच्या आजाराचं निदान झालं. 

दिवसागणिक आजारपण वाढत गेलं आणि मग झिनत यांनी पतीची काळजी घेण्यासाठी स्वत:ला झोकून दिलं. यादरम्यानच त्यांचं निधन झालं. खरं आव्हान पुढे होतं. कारण, मजहरच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी सर्व पैसे आणि संपत्तीवर हक्क सांगितला होता किंबहुना सर्वकाही बळकावलं होतं. 

Zeenat Aman: The ultimate glam diva of Indian cinema | People News | Zee  News

झिनत आणि त्यांची मुलं एकाएकी वाऱ्यावर पडली. एका वळणावर तर झिनत यांच्या सासूनं मुलांच्या मनात त्यांच्याविरोधात कटू मत तयार करण्याचाही प्रयत्न केला होता. पण, तसं झालं नाही आणि या वादळात त्यांना किमान मुलांची साथ मोठा दिलासा देऊन गेली. 

झगमगणाऱ्या विश्वात नाव कमवणारी ही अभिनेत्री इतकं सगळं सहन करत होती याची कोणालाच कल्पना नव्हती. पण, जेव्हा ही बाब समोर आली तेव्हा तिची कहाणी चाहत्यांचे डोळे पाणावून गेली. Source link

Leave a Reply