Headlines

buldhana mla sanjay gaikwad gave threat warning to shivsena workers in buldhana

[ad_1]

बुलढाण्यात शिवसेनेच्या सत्कार समारंभात शनिवारी शिंदे गट आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला होता. या राड्यानंतर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केले आहे. पुन्हा राडा केल्यास “चून चून के मारे जाएंगे” असा धमकीवजा इशारा गायकवाड यांनी बुलढाण्यातील स्थानिक शिवसैनिकांना दिला आहे. ज्या लोकांना प्रेमाची भाषा कळत नाही, त्यांच्यासाठी हीच भाषा वापरणार, असेही गायकवाड म्हणाले आहेत. खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच आहे, असा पुनरुच्चारही त्यांनी केला आहे.

बुलढाण्यात शिवसेना- शिंदे गटात संघर्ष; खुर्च्यांची फेकाफेक, लाथाबुक्क्यांनी मारहाण

शनिवारी झालेल्या राड्यात पोलिसांनी मध्यस्थी केली नसती तर तेव्हाच हिशोब चुकता केला असता, असेही गायकवाड म्हणाले आहेत. पुन्हा राडा केल्यास आम्ही काय आहोत हे दाखवून देऊ, असा इशारा गायकवाड यांनी स्थानिक शिवसैनिकांना दिला आहे. बुलढाण्यातील काही शिवसैनिक पातळी सोडून बोलत आहेत. गेली ४० वर्ष शिवसेनेसाठी एकनिष्ठपणे काम केल्यानंतर आम्हाला ‘गद्दार’ म्हणण्याचा त्यांना अधिकार आहे का? असा सवाल गायकवाड यांनी केला आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंसह इतर नेत्यांनी आजवर अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह शिंदे गटातील आमदारांवर शाब्दिक हल्ला चढवला. मात्र, याला आम्ही कधीच प्रत्यूत्तर दिले नाही, असे गायकवाड म्हणाले आहेत.

“उद्धव ठाकरेंचं नेतृत्व म्हणजे…..”; भाजपा आमदार प्रसाद लाड यांचे किशोरी पेडणेकरांना प्रत्युत्तर

दरम्यान, शनिवारी बुलढाणा बाजार समितीत पोलीस बंदोबस्तात सुरू असलेल्या शिवसेनेच्या सत्कार कार्यक्रमात शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला होता. यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, उपजिल्हाप्रमुख संजय हाडे यांच्यासह उपनेते लक्ष्मण वडले यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. खेडेकर यांनी हल्ला करणाऱ्यांमध्ये आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड तसेच त्यांचे सहकारी आघाडीवर होते, असा आरोप केला आहे. १५ मिनिटे चाललेल्या या राड्यात कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची फेकाफेक करत लाथाबुक्क्यांनी एकमेकांना मारहाण केली. या प्रकरणात आता दोन्ही गटातील नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *