Boycott च्या शिक्क्यामुळेच दणकून चालले ‘हे’ चित्रपट; तुम्हीही पाहिले असतीलच


Boycott Trend in Bollywood: सध्या ‘लाल सिंग चढ्ढा’, ‘रक्षाबंधन’ आणि ‘डार्लिंग्स’ या तीन चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरक्षः boycott चा शिक्का दिला आहे. अचानक असे काय झाले आणि या चित्रपटांना बायकोटचा शिक्का बसला याचे उत्तर कोणालाच कळले नाही. परंतु सध्या सर्वाधिक चर्चा आहे ती ‘लाल सिंग चढ्ढा’ या चित्रपटाची. या चित्रपटातून पुन्हा एकदा आमीरने 2014 साली प्रदर्शित झालेल्या PK या चित्रपटात केल्याप्रमाणेच अभिनय केला असल्याचा आरोप त्याच्यावर प्रेक्षकांकडून होतो आहे त्यात याच वादाला फोडणी म्हणून आमीरचा ‘लाल सिंग चढ्ढा’ हा हॉलीवूडच्या ‘फॉरेस्ट गम्प’ या अजरामर कलाकृती केलेला रिमेक हा अत्यंत खोटा आणि नाटकी असल्याचाही आरोप आमीर खानवर करण्यात आला आहे. 

त्यामुळे सध्या सर्वत्र आमीरला प्रेक्षकांचा रोष सहन करावा लागतो आहे. #boycottlaalsinghchadda हा ट्रेण्ड प्रचंड व्हायरल झाल्यानंतर आपण आपल्या देशावर किती प्रेम करतो असे वक्तव्य करत आमीरखानला प्रेक्षकांना कृपया माझा चित्रपट पाहा अशी विनवणी करावी लागते आहे. ‘लाल सिंग चढ्ढा’सोबतच अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ आणि आलिया भट्टचा ‘डार्लिंग्स’ हा चित्रपटही boycott करण्यात यावा अशी मागणी प्रेक्षक करत आहे. 

सध्या हे चित्रपट boycott करण्याचे वावडे लागले असले तरी यापुर्वी कारणं कोणतीही असोत पण हिंदी चित्रपट boycott करून सुद्धा ते चित्रपट प्रेक्षकांनीच उचलून धरले होते. खालील चित्रपटांची यादी हेच सिद्ध करते की boycott मुळे झालेल्या कुप्रसिद्धीचा उलट या चित्रपटांना फायदाच झाला आहे. 

दंगल
‘दंगल’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापुर्वी आमीर खानचे एक वक्तव्य बरेच चर्चेत होते ते म्हणजे त्याला आणि त्याची पत्नी किरण राव हिला भारतात असुरक्षित वाटत असल्याचे त्याने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते. त्याच्या या वक्तव्यामुळे राजकीय ताणताणाव वाढू लागले आणि त्यामुळे अनेकांकडून आमीरच्या दंगल या चित्रपटाला boycott करण्याची मागणी सुरू झाली होती. परंतु इतके होऊनही हा चित्रपट मात्र बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटाने जगभरातून हजार कोटींचा बिझनेझ केला होता. 

पीके
‘पीके’ या चित्रपटाचा ट्रेलर पाहून अनेकांनी हा चित्रपट धर्माबद्दल चुकीचे प्रदर्शन करतो आहे अशी टिप्पणी करण्यात आली होती त्यावेळी हा चित्रपटही boycott करण्यात आला होता परंतु या चित्रपटाने मात्र आठशे कोटी रूपयांचा गल्ला भरला होता. 

पद्मावती
राणी पद्मावतीच्या व्यक्तिमत्त्वाचे चुकीचे प्रदर्शन केल्याने करणी सेनेने यावर मोठा आक्षेप घेत चित्रपटाला boycott केले होते. या चित्रपटाने चारशे ते पाचशे कोटी रूपयांचा गल्ला भरला होता. 

बाजीराव मस्तानी
‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटावर पेशव्यांच्या वंशजांनी आणि इतिहासकारांनी आक्षेप घेतला होता. काशीबाई आणि मस्तानी यांना एकत्र नाचाताना तसेच बाजीरावा यांनाही नाचताना दाखवले होते त्यामुळे हाही चित्रपट boycott करून या चित्रपटाने तीनशे कोटीच्या वर कमाई केली होती. 

गंगुबाई काठियावाडी 
‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटावरही boycott चा शिक्का लागला होता. गंगुबाईंची माहिती या चित्रपटातून चुकीच्या पद्धतीने मांडल्याचा या चित्रपटावर आरोप होता परंतु याही चित्रपटाने दोनशे कोटींचा गल्ला भरला. Source link

Leave a Reply