दोन बायका… आमिरच्या लेकिसमोरच एकत्र आल्या दोन्ही Ex Wife आणि…


मुंबई : काही दिवसांपूर्वीच अभिनेता आमिर खान याची मुलगी आयरा खान, हिचा 25 वा वाढदिवस पार पडला. यावेळी कुटुंबीय आणि खास मित्रांच्या उपस्थितीत तिनं हा दिवस साजरा केला. फक्त आमिरच नव्हे, तर त्याची Ex Wife रिना आणि किरणही या पार्टीला आल्या होत्या. (aamir khan ex wife )

रिना आणि किरण या दोघींशीही आमिरचं असणारं नातं आता सर्वज्ञात आहे. लग्नाच्या नात्यातून विभक्त झालेलं असतानाही तो या दोघींशी मैत्रीचं नातं टिकवून आहे. 

परिणामी एकत्र असतानाही त्यांच्यामध्ये कोणताही संकोचलेपणा दिसत आहे. हो, पण आयराच्या वाढदिवसानिमित्तानं आमिरच्या कुटुंबासमवेत आणखी एक चेहरा लक्ष वेधण्याचं काम करत होता. (aamir khan ira khan)

रुपेरी पडद्यावरया व्यक्तीनं आमिरसोबत स्क्रीनही शेअर केली आणि अचानक त्यांची  नावं एकत्रितरित्या घेतली जाऊ लागली. 

या चर्चांना अधिक वाव मिळाला तो म्हणजे आमिरचा दुसऱ्यांना घटस्फोट झाल्यानंतर. हा चेहरा होता अभिनेत्री फातमा सना शेख हिचा. 

म्हणे फातिमा आयराची खूप चांगली मैत्रीण आहे. पण, मुद्दा असा की एकाएकी आयरा आणि फातिमाची मैत्री झाली कशी आणि झाली असली तरीही मग दुसरी ‘दंगल गर्ल’ इथं का नाही… नेटकऱ्यांना सध्या हे फोटो पाहून असेच विविध वाटा फुटणारे प्रश्न पडत आहेत. 

अर्थात त्यांच्या या प्रश्नांची उत्तरं केव्हा मिळतील, मिळतील की नाही हेसुद्धा अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हे आता येणारा काळच ठरवेल असं म्हणणं वावगं ठरणार नाही… कारण, ‘कितने अजीब रिश्ते है यहाँ के’… Source link

Leave a Reply