बॉलिवूडमधले चर्चित आणि महागडे घटस्फोट, द्यावे लागले लाखो-करोडो रुपये


Entertainment : बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटी त्यांच्या लव्ह लाईफपेक्षा घटस्फोट आणि ब्रेकअपमुळे चर्चेत असतात. बॉलिवूडमध्ये जितक्या लवकर नातेसंबंध तयार होतात, तितक्या लवकर ते तुटतात आणि वेगळे होतात. बॉलिवूडमधले हाय प्रोफाईल विवाहसोहळे  (High Profile Marriage) नेहमीच चर्चेत असतात. पण त्याहून जास्त चर्चेत असतात ते हायप्रोफाईल घटस्फोट (High Profile Divorce). आपल्या जोडीदाराला करोडो रुपये पोटगी म्हणून द्यावे लागतात. आपण जाणून घेणार आहोत असेच काही चर्चित असलेले आणि महागड्या घटस्फोटांबद्दल.

ऋतिक रोशन आणि सुझैन खान
अभिनेता ऋतिक रोशन (Hrithik Roshan ) आणि सुझैन खान  (Sussanne khan ) ही बॉलिवूडमधली परफेक्ट जोडी मानली जात होती. पण जेव्हा 14 वर्षांनी एकत्र राहिल्यानंतर घटस्फोटाचा निर्णय घेतला तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला. 2013 मध्ये या दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. हृतिक रोशन आणि सुझैन खान यांचा घटस्फोट हा बॉलिवूडमधील सर्वात महागडा घटस्फोट होता. सुझैन खानने पोटगी म्हणून 400 कोटी रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर ही रक्कम कमी करण्यात आली. ऋतिक रोशनने सुझैनला तब्बल 380 कोटी रुपये दिले.

मलायका अरोरा आणि अरबाझ खान
अभिनेता अरबाझ खान (Arbaaz Khan) आणि अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) यांचा बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चिला गेलेला घटस्फोट. या दोघांचं प्रेमप्रकरण चांगलंच गाजलं. तब्बल 5 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लगन करण्याचा निर्णय घेतला. यानंतर 13 वर्ष त्यांचं लग्न टिकलं, पण नंतर त्या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार मलायकाला 10 ते 15 कोटी रुपये पोटगी म्हणून मिळाले. मलायका आणि अरबाझ खानचा मुलगा अरहान मलायकाबरोबर रहातो. 

फरहान अख्तर आणि अधुना भबानी
अभिनेता फरहान अख्तरने (Farhan Akhtar) शिबानी दांडेकरशी (Shibani Dandekar) लग्नगाठ बांधली. पण त्याआधी फरहान अख्तर आणि अधुना भबानी (Adhuna Bhabani) यांनी 2016 मध्ये काडीमोड घेतला. तब्बल 16 वर्षांनी या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटाच्या बदल्यात त्यांच्या पत्नीने त्यांच्याकडे मुंबईतील 1000 चौरस फुटांचा बंगला मागितला होता. यासोबतच फरहान आपल्या मुलीची काळजी घेण्यासाठी अधुनाला दर महिन्याला मोठी रक्कम देतो.

करिश्मा कपूर आणि संजय कपूर
अभिनेत्री करिश्मा कपूर (Karishma Kapoor) आणि संजय कपूर (Sanjay Kapoor) यांनी 13 वर्षांनंतर घटस्फोटाचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार करिश्माला मुंबईतील बंगला मिळाला आहे. शिवाय 14 कोटी रुपयांचे बाँड तिच्या नावावर करण्यात आले आहेत. ज्यातून तिला महिना 10 लाख रुपये व्याज मिळतं. संजय कपूरने हे बाँड आपल्या मुलांच्या नावावर घेतले होते.

संजय दत्त आणि रिया पिल्लई
संजय दत्त (Sanjay Dutt) आपल्या जीवनात नेहमीच चर्चेत राहिला आहे. मान्यता दत्तबरोबर (Manyata Dutt) लग्न करण्यापूर्वी संजय दत्तने पहिली पत्त्नी रिया पिल्लईला घटस्फोट दिला. 1998 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. रिया पिल्लई (Riya Pillai) लिएंडर पेसच्या मुलाची आई होईपर्यंत संजय दत्तने तिचा खर्च उचलला. एका महागड्या कारबरोबरच सीफेसिंग लक्झरी अपार्टमेंट तिच्या नावावर केला. मुंबईतील महागड्या शाळेत शिकणाऱ्या मुलीच्या खर्चासाठी महिना 4 लाख रुपयांची मागणीही रिया पिल्लईने केली होती.

सैफ अली खान आणि अमृता सिंग
अभिनेता सैफ अली खानने (Saif Ali Khan) 2004 मध्ये त्याच्याहून 13 वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्री अमृता सिंगबरोबर (Amruta Singh) लग्ने केलं. त्यावेळी सैफअलीचा हा निर्णय चाहत्यांसाठी धक्कादायक होतं. लग्नाच्या 12 वर्षांनी दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला.  सैफने स्वतः एका मुलाखतीत सांगितलं होतं की, पोटगी म्हणून त्याने अमृताला 5 कोटी रुपये दिले. यासोबतच मुलांचा सांभाळ करण्यासाठी महिन्याला लाखो रुपये सैफ अली खान देत होता. Source link

Leave a Reply