बॉलिवूड अभिनेत्रीला 4 कोटींचा गंडा; अशी फसवणूक याआधी पाहिलीच नसेल


मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री सध्या मोठ्या संकटातून जात असल्याचं पाहायला मिळत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या अभिनेत्रीकडून गुंतवणुकीच्या नावानं 4 कोटी रुपये उकळण्यात आले आहेत. 

सदर प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेत पुढील तपास सुरु केला. 

ज्या अभिनेत्रीची फसवणूक करण्यात आली आहे, तिचं नाव आहे, रिमी सेन. खार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्री रिमी सेन हिनं गोरेगावस्थित व्यावसायिक जतिन व्यास याच्या नावे 4.14 कोटी रुपयांचा गंडा घालण्याची तक्रार केली आहे. 

सदर तक्रारीनंतर भारतीय दंडसंविधानाअन्वये कलम 420 आणि कलम 409 अंतर्गत गुन्ह्याची नोंद झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या पोलीसही सध्या गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी पावलं उचलताना दिसत आहेत. 

‘हंगामा’, ‘धूम’, ‘बागबान’, ‘गोलमाल’ या चित्रपटांतून झळकलेली रिमी सध्या मात्र चित्रपटांच्या दुनियेपासून दूर असल्याचं दिसून येत आहे. सातत्यानं गाजलेल्या चित्रपटांतून ती झळकली असली, तरीही दहा वर्षांहून अधिक काळ लोटला, पण ती मात्र रुपेरी पडद्यावर झळकली नाही. 

ये बॉलीवुड एक्ट्रेस हुई बड़ी ठगी का शिकार, सवा चार करोड़ रुपए का लग गया चूना

रिमीनं कलाविश्वं गाजवलं तेव्हा हिंदी चित्रपटांमध्ये पुरुषांचं अधिपत्य होतं, महिला कलाकार सहायक भूमिकेत झळकत होत्या. त्यातही तिला सातत्यानं विनोदी भूमिकाच दिल्या जात होत्या, अशा भूमिका साकारण्यापेक्षा तिनं बॉलिवूडमधून काढता पाय घेण्याचा पर्याय निवडला. 

एका मुलाखतीदरम्यान तिनं कलागतापासून दुरावा का पत्करला यामागचं कारण स्पष्ट केलं.                                                                                                                                                                                                                                                                      Source link

Leave a Reply