Biggest Bank Scam | चुना लावण्याच्या बाबतीत नीरव मोदीलाही पछाडलं, देशातील सर्वात मोठा बँकींग घोटाळा


गांधीनगर  :  बँकेची फसवणूक करणं  (Gujrat Biggest Bank Scam) आणि पैसे घेऊन परदेशी पळ काढणं, या आणि यासारख्या आयडिया आता जुन्या झाल्या आहेत. मात्र त्याचं प्रमाण आजही वाढतंच आहे. काही वर्षांपूर्वी विजय माल्याने (Vijay Mallya) बँकेचं कर्ज बुडवलेलं. तसेच नीरव मोदी (Neerav Modi) आणि मेहलु चोक्सी (Mehul Chokshi) या दोघांनी पंजाब नॅशनल बँकेची (Punjab National Bank) फसवणूक केली होती. या घटना आपल्या सर्वांच्याच चांगल्याच लक्षात आहे. मात्र आता जो काही घोटाळा समोर आला आहे, यामध्ये तर या संबंधितांनी बँकेला चुना लावण्याच्या बाबतीत नीरव मोदीलाही मागे टाकलं. (biggest bank scam by abg shipyard 22 thousand crore rupees know all matter)

हा सर्व बँक घोटाळा कोणी केला, फसवणुकीचा प्रकार कुठे घडला, हे आपण सविस्तर जाणून घेऊयात. एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया, देशातील सर्वात मोठ्या बँकेपैकी अग्रणी बँक. याच एसबीआय बॅंकेच्या कुलाबा शाखेचे डेप्युटी जनरल मॅनेजर बालाजी सिंह सामंता यांनी या घोटाळ्याचा आरोप केला आहे. 

गुजरातमधील कंपनी एबीजी शिपयार्ड (Abg Shipyard) आणि त्या कंपनीच्या संचालकांवर घोटाळा केल्याचा ठपका एसबीआयच्या (Sbi) डीजीएम यांनी केला आहे. हा घोटाळा तब्बल 22 हजार 842 कोटींचा असल्याचं म्हटलं जात आहे.  

डीजीएम सामंता यांच्या आरोपानंतर सीबीआयने या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार चौकशी सुरु करण्यात आला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये एबीजी शिपयार्ड या कंपनीचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच  कंपनीच्या संचालंकाची नावंही यात आहेत.   

आणखी कोणाची नावं? 

एफआयआरमध्ये कंपनीचे सर्वेसर्वा आणि व्यवस्थापकीय संचालक ऋषि कमलेश अग्रवाल, गॅरेंटर संथानम मुथास्वामी, कार्यकारी संचालक अश्विनीकुमार, संचालक सुशील कुमार अग्रवाल, संचालक रवी विमल निवेतिया आणि मेसर्स एबीजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड यांचं नाव आहे.

असा आहे सर्व ‘झोल’

डीजीएम सामंता यांनी 25 ऑगस्ट 2020 रोजी सीबीआयकडे या संपूर्ण प्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानुसार सीबीआय या केंद्रीय यंत्रणेने तपास सुरु केला. तसेच एबीजी शिपयार्ड कंपनीसह कंपनीचे संचालक आणि काही अज्ञात सरकारी अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. 

या सर्वांच्या विरोधात फसवणुकीचा कट रचणे, अधिकारांचा दुरुपयोग आणि घोटाळ्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

एबीजी शिपयार्ड कंपनीने कायदे तोडून बँकांच्या समुहाची फसवणूक केली. त्यामध्ये आयसीआयसीआय बँकेचाही समावेश आहे. तब्बल 28 विविध बँकांकडून कर्ज घेतलं आहे. नीरव मोदीने 13 हजार 200 कोटींचा पंजाब नॅशनल बँक घोटाळा केला होता. 

मात्र गुजरातमधील या घोटाळ्याचा विविध बँकांना तब्बल 22 हजार 842 कोटींचा फटका बसला आहे. म्हणूनच देशातील हा सर्वात मोठा बँक घोटाळा आहे. हे सगळे पैसे वसुल होणार का? सीबीआय किती कडक कारवाई करणार? याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.Source link

Leave a Reply