Headlines

बिग बॉस फेम जास्मिनचा दुबईत दुसरा बॉयफ्रेंड, त्या रात्रीचा फोटो व्हायरल

[ad_1]

मुंबई : टीव्ही अभिनेत्री जास्मिन भसीनमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यापासून तिला अनेक प्रोजेक्ट मिळाले आहेत. ती लवकरच एका पंजाबी चित्रपटात दिसणार आहे.

बिग बॉसमध्ये जास्मिन आणि अली गोनीची केमिस्ट्री खूप पसंत केली जात होती. या शोमध्ये दोघेही मित्र म्हणून गेले होते, पण बाहेर येताच दोघे रिलेशनशिपमध्ये आले.

जास्मिन आणि अली अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसतात. जस्मिन सध्या दुबईत सुट्टीसाठी आहे. तिने तिच्या बॉयफ्रेंडसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. पण हा बॉयफ्रेंड अली गोनी नसून दुसराच कुणीतरी आहे. ज्यामुळे सगळेच चकीत झाले आहेत. 

जास्मिन तिच्या व्हेकेशनमधील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. ती तिची मैत्रिण आणि अभिनेत्री पूर्वा राणासोबत दुबईत वेळ घालवत आहे.

नुकतेच रात्री जेवायला गेल्याचा एक फोटो तिने शेअर केला. ज्याचे फोटो दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

जस्मिनने तिच्या नवीन बॉयफ्रेंडची ओळख करून दिली. त्यामुळे तिला अनेकांनी अली गोनीला सोडलंस का असा ही प्रश्न विचारला आहे. 

जस्मिनने इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती चिंपांझीच्या पुतळ्यासोबत उभी असल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करताना तिने लिहिले – माझा दुबईतील बॉयफ्रेंड. पुढे तिने हसणारा इमोजीही पोस्ट केला. फोटोंमध्ये जास्मिनने काळ्या आणि राखाडी रंगाचा ड्रेस घातलेला दिसत आहे.

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *