हृतिकच्या बहिणीला Kartik Aaryan करतोय डेट? अभिनेत्याकडून मोठा खुलासा


Kartik Aaryan on Relationship : झगमगत्या विश्वात आपल्या नावाचा ठसा उमटवण्यासाठी अभिनेता कार्तिक आर्यनने (Kartik Aaryan) मोठा खस्त खाल्ला. ‘भूल भुलैया 2’ सिनेमाच्या यशानंतर अभिनेत्याच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक असणारा कार्तिक खासगी आयुष्यामुळे देखील तुफान चर्चेत असतो. आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत अभिनेता कार्तिक आर्यनचं नाव जोडण्यात आलं आहे. पण आता चक्क अभिनेता हृतिक रोशनच्या बहिणीसोबत कार्तिक रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगत आहेत. (Kartik Aaryan on Relationship)

असंख्य मुलींच्या मनावर राज्य करणाऱ्या कार्तिकच्या मनात मात्र हृतिकची बहिण पशमीना रोशन (pashmina roshan) राज्य करते. मिळालेल्या माहितीनुसार  पशमीना रोशन आणि कार्तिक आर्यन यांच्या भेटण्याचं प्रमाण वाढलं आहे.  पण आता खुद्द कार्तिकने त्यांच्या खासगी आयुष्यावर मोठा खुलासा केला आहे. 

कार्तिक म्हणाला, ‘मला एक गोष्ट कळाली आहे की, मी आता एक सेलिब्रिटी आहे. माझी कोणतीही गोष्ट लोकांमध्ये कायम चर्चेत असते. माझी कोणासोबत मैत्री नसली तरी, त्या नात्याला रिलेशनशिपचं लेबल लावलं जातं. ‘ असं अभिनेता म्हणाला. 

कार्तिक पुढे म्हणतो, ‘सोशल मीडियावर अनेक चांगल्या – वाईट गोष्टी रंगत असतात. मला त्यामुळे काही फरक पडत नाही. पण जेव्हा माझ्याबद्दल सोशल मीडियावर वाईट गोष्टी रंगत असतात, तेव्हा मला प्रचंड वाईट वाटतं. पण मी आता माझी समज घालतोय सेलिब्रिटीचं खासगी आयुष्य आयुष्य खासगी ठेवणं प्रचंड कठीण असतं… ‘ असं देखील अभिनेता म्हणाला. 

दरम्यान, कार्तिक आर्यन आणि पशमीनाच्या नात्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगायला लागल्यापासून अभिनेत्याच्या चाहत्यांना पशमीना रोशनबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. पशमीना रोशन ही हृतिक रोशनची चुलत बहीण आहे.

पशमीना अभिनेत्री नसली तरी, सोशल मीडिायवर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. (pashmina roshan bollywood debut) पशमीना रोशन लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण (pashmina roshan bollywood) करणार आहे. शाहिद कपूरच्या ‘इश्क विश्क’च्या सिक्वेलमध्ये पशमीना रोशनला कास्ट करण्यात आलं आहे. 



Source link

Leave a Reply