Headlines

Bhagat Ki Kothi Express accident near gondia more then 50 passenger injured

[ad_1]

बिलासपूरहून राजस्थानमधील भगत की कोठीकडे जाणाऱ्या ‘भगत की कोठी’ (Bhagat Ki Kothi) एक्सप्रेसचा गोंदिया शहराजवळ अपघात झाल्याची घटना घडली. समोरुन येणाऱ्या मालगाडीला या एक्सप्रेसने धडक दिली. मध्यरात्री अडीच वाजता हा अपघात घडला. या अपघातानंतर या ट्रेनचा एक डब्बा रुळाखाली घसरला असून ५० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर गोंदियातील जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हेही वाचा- बुलढाणा : मेंढपाळांचा वनमजुरांवर हल्ला; महिला वनाधिकाऱ्याने हवेत गोळीबार करून वाचवले प्राण

सिग्नल न मिळाल्यामुळे अपघात

मिळालेल्या माहितीनुसार भगत की कोठी एक्सप्रेस छत्तीसगडच्या बिलासपूरहून राजस्थानमधील भगत की कोठीकडे जात होती. गोंदिया स्थानकाजवळ ही गाडी आली असता सिग्नल न मिळाल्यामुळे समोरुन येणाऱ्या मालगाडीवर ही एक्सप्रेस आदळली. या अपघातानंतर एक्सप्रेस एस-३ डबा रुळावरून घसरला. या धडकेनंतर रेल्वेमधील ५० पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. काहींच्या हाताला, पायाला, छातीला तर काहींना डोक्याला इजा झाली आहे. यापैकी ३ प्रवासी गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा- चंद्रपूर : महिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

चौकशीचे आदेश

इतर सुखरुप प्रवाशांना सकाळी पावणे आठ वाजता दुसरी रेल्वे भगत की कोठीकडे रवाना करण्यात आली. अपघातग्रस्त रेल्वेडबा रुळावरून उचलण्यात आला असून या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. घटनेच्या चौकशी आदेश देण्यात असल्याची माहिती दक्षिण -पूर्व-मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मनिंदरसिंग उप्पल यांनी दिली.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *