राखी सावंतच्या चाहत्यांसाठी आणखी एक वाईट बातमी; जाणून बसेल धक्का…


मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतनं (Rakhi Sawant) काही महिन्यांपूर्वी तिचा आणि रितेशचा (Ritesh) घटस्फोट झाल्याचे सांगितलं होतं. दरम्यान, यानंतर राखीनं तिच्या आणि बॉयफ्रेंड आदिलच्या (Adil Durrani) लग्नाचे फोटो शेअर केले होते. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. राखीनं आदिल खान दुर्रानीसोबत मुस्लिम परंपरेनं विवाह केला. दरम्यान, आदिल खाननं त्याचं आणि राखीचं लग्न झालं नाही असं म्हटलं होतं. यानंतर नुकतंच आदिलनही राखीसोबत लग्न केल्याचं माध्यमांसमोर कबूल केलं.

अभिनेत्री राखी सावंत या दिवसांत तिच्या लग्न आणि तिच्या आईच्या आजारपणामुळे खूप चर्चेत आहे. राखीने आता मोठा खुलासा केलाय की, ती प्रेग्नंट होती. मात्र तिचा गर्भपात झालाय. राखीचं म्हणणं आहे की, तिने बिग बॉस मराठी सीजन ४ (Bigg Boss Marathi Season 4) मध्ये याचा उल्लेखही केला होता. मात्र कोणीही याला गंभीर घेतलं नाही. 

विरल बयानीने त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने सांगितलं आहे की, राखीने त्यांच्यासोबतच्या चर्चेदरम्यान तिचा गर्भपात झाल्याची माहिती दिली आहे. विरल बयानीसोबत चर्चेदरम्यान तिने सांगितलं की, हो मी प्रेग्नंट होती आणि मी बिग बॉस मराठई शो देखील अनाऊंन्स केला. मात्र सगळ्यांना हेच वाटलं की, मस्करी करतेय आणि कोणीच या गोष्टीला सिरीअस घेतलं नाही. राखी म्हणाली की, तिचं मिसकैरेज झालं आहे.

राखी सावंतच्या प्रेग्नेंसीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते
राखीने अनेक मुलाखतींमध्ये तिच्या प्रेग्नेंसीबद्दल काहीही बोलण्यास नकार दिला. राखी प्रेग्नंट असल्याचा अंदाज लोकांनी लावला होता, त्यामुळेच तिने लग्नाची घोषणा केली होती. मात्र, आता राखी सावंतच्या या घोषणेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून राखी सावंत गरोदर असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. 

राखी सावंतचं लग्न सात महिन्यांपूर्वी झालं होतं
राखी सावंतने ७ महिन्यांपूर्वी बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीसोबत लग्न केलं. ‘बिग बॉस मराठी सीझन 4’ च्या नंतर, तिने तिच्या लग्नाची घोषणा केली आणि फोटो आणि व्हिडिओ देखील शेअर केले होते. तिच्या लग्नाला खोटं म्हटलं जातं होतं म्हणून ती खूप अस्वस्थही होती. मात्र, आता आदिल खान दुर्रानीनेही राखीसोबतचं लग्न मान्य केलं आहे.Source link

Leave a Reply