Headlines

येत्या पंधरा दिवसात बार्शी शहरातील अनेक भागात २० कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन होणार – आमदार राजेंद्र राऊत

बार्शी नगर परिषदेच्या वतीने बार्शी शहरातील पांडे चौक, भीम नगर, हांडे गल्ली या भागातील १ कोटी, २० लाख, २२ हजार, ८२४ रुपये किमतींच्या रस्ते डांबरीकरण व गटार बांधणी कामाच्या शुभारंभ प्रसंगी आमदार राजेंद्र राऊत बोलत होते.

बार्शी शहरात आमच्या सत्तेच्या कारकिर्दीत साडे चार वर्षांमध्ये शेकडो कोटी रुपयांची विकास कामे करण्यात आली व भविष्यकाळातील जवळपास २० कोटी रुपयांची कामे सुरू होणार आहेत. बार्शी शहरातील नागरिकांकरिता प्राथमिक सुविधा, प्राथमिक गरजा पूर्ण करण्याचा आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून प्रयत्न केला. हे कामे करीत असताना शहरातील अविकसित भाग व शहराचा जुना गावठाण भागात ही अनेक प्रकारची रस्ते, गटारी, दिवाबत्ती, भुयारी गटार योजना आदी विकास कामे करण्यात आली. पावसाळ्याच्या मागील चार महिन्यात अनेक विकास कामे पावसामुळे थांबली होती. परंतु आता पावसाळा संपल्यानंतर शहरातील विविध भागात विकास कामे वेगाने सुरू होणार आहेत व अर्धवट राहिलेली विकास कामेही पूर्ण होणार आहेत.

बार्शी शहरातील नागरिकांनी विकास कामांच्या बाबतीत निश्चिंतपणे राहावे, कोणतीही काळजी करू नये. शहराच्या प्रत्येक भागातील रस्ते, गटारी, दिवाबत्तीची कामे पूर्ण केली जातील असेही आमदार राजेंद्र राऊत म्हणाले.ही विकास कामे सुरू असताना बार्शीकर नागरिकांना थोड्याफार प्रमाणात त्रास झाला, याबद्दल आम्ही त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. नगर परिषदेच्या निवडणुकीत दिलेल्या वचननामधील विकास कामे बार्शीकर नागरिकांकरिता पूर्णत्वाकडे नेत आहेत, त्यांनी आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवत आहोत याचा आम्हाला अभिमान आहे.

यावेळी नगराध्यक्ष ॲड. आसिफभाई तांबोळी, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, नगरसेवक विलास आप्पा रेनके, आण्णासाहेब लोंढे, प्रशांत कथले, सुभाष शेठ लोढा, तानाजी बापू गव्हाणे, भिमजी पवार, किसन आप्पा पवार, नंदकुमार वायकुळे, दादासाहेब हांडे, विष्णू गुंड,हमू वायकुळे, नाना गाडे, भारत गाडे, आबासाहेब हांडे, प्रमोद धुमाळ, नागनाथ अडसूळ, बाजार समितीचे संचालक रावसाहेब मनगिरे, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, पक्षनेते विजय नाना राऊत, नगरसेविका रजियाताई बागवान, सौ. आशाताई लोंढे, ॲड.महेश जगताप, ॲड. अविनाश गायकवाड, भारत पवार, सुधीर बारबोले, शंकर वाघमारे, श्रीकांत शिंदे, आनंद पवार, दिपक राऊत, कालिदास मुकटे, बाळासाहेब पवार, देवेंद्र कांबळे, दयानंद लंकेश्वर, ॲड. प्रसन्नजीत नाईकनवरे, विवेक गजशीव, दिपक काकडे, भोला अडसूळ, हरि कांबळे, नितेश बोकेफोडे, दयावान कदम, विजय चव्हाण, शरद फुरडे, संतोष बारंगुळे, गणेश चव्हाण, रोहित लाकाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *