बार्शी नगरपालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण संपन्न

बार्शी – आज रोजी स्वच्छ सर्वेक्षण 2022 व माझी वसुंधरा अभियान 2.0. अंतर्गत बार्शी नगरपरिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध ऑनलाईन व ऑफलाईन घेतलेल्या स्पर्धांचे पारितोषिक वितरण समारंभ यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. बार्शीकर नेहमीच उत्तम कामासाठी पुढे असतात ,बार्शी च्या विकासासाठी शहरातील विद्यार्थी, पालक ,शाळा, विविध अस्थापना यांनी घेतलेले परिश्रम उल्लेखनीय आहेत. शहराच्या स्वच्छ सर्वेक्षण 2022 व माझी वसुंधरा अभियान या कामांमध्ये सर्वांनी केलेली साथ निश्चितपणे विकासाकडे घेऊन जाणारी आहे असे प्रतिपादन बार्शी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती अमिता दगडे- पाटील यांनी केले.

बार्शी नगरपालिकेच्या माझी वसुंधरा अभियान 2.0 आणि स्वच्छ सर्वेक्षण 2022 च्या पारितोषिक वितरण प्रसंगी त्यांनी बार्शी शहरातील नागरिकांना घरातील ओला व सुका कचरा वर्गीकरण करून घंटागाडी मध्ये देऊन आपल्या सभोतालचा परिसर नियमित स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा असे त्यांनी कार्यक्रमावेळी आवाहन केले. त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बानपा शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे, आरोग्य विभाग प्रमुख शब्बीर वस्ताद ,शहर समन्वयक गणेश पाटील ,पर्यवेक्षक संजय पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध गटातील विजेत्यांना सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. सत्कार मूर्ती यांच्या वतीने डॉ. संजय अंधारे ,मुख्याध्यापक प्रशांत कोल्हे, प्रा. इंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शहरातील सुमारे 145 व्यक्ती, विद्यार्थी ,संस्था ,विविध अस्थापना, शाळा यांना गौरवण्यात आले .

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शृंगारपुरे ,सौ प्रचंडराव यांनी केले. प्रास्तविक भाषण श्रीधर कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन आरोग्य विभाग प्रमुख शब्बीर वस्ताद यांनी केले.

बक्षीस वितरण समारंभ , स्पर्धेतील विजेते

  • वक्तृत्व स्पर्धा- कु.श्राविका संपत जाधव, कु. प्रगती प्रदीप गोंदक
  • चित्रकला स्पर्धा- कु.फल्ले तनिष्का उमेश, कु.कांबळे विनया पांडुरंग
  • निबंध स्पर्धा- कु.श्रावणी मिलिंद विठकर, कु.सृष्टी नागनाथ उकिरडे
  • रांगोळी स्पर्धा- कु.तेजस्वी अनिल बनसोडे, कु.उत्कर्ष पोपट कळसाईत
  • झिंगल स्पर्धा- सार्थक सुखदेव नाईकवाडी
  • शाॕर्ट फिल्म स्पर्धा- अमोल शंकर वाघमारे
  • स्वच्छ कार्यालय स्पर्धा-
  • 1.कृषी उत्पन्न बाजार समिती,

2. बार्शी शहर पोलीस ठाणे,

3. भारतीय स्टेट बँक

  • बार्शी स्वच्छ हॉस्पिटल स्पर्धा-
  • 1. सुश्रुत हॉस्पिटल

2. डॉ.पाटील बाल रुग्णालय व प्रसूतिगृह

3. विघ्नहर्ता क्लीनिक

  • स्वच्छ दुकान /मार्केट स्पर्धा-
  • 1. प्रसन्नदाता होम शॉप आपलायसेन्स

2. नवयुग भांडार

3. खांडवीकर मॅचींग सेंटर

  • स्वच्छ हॉटेल स्पर्धा-
  • 1. हॉटेल रामकृष्ण एक्झिक्यूटिव्ह

2. भगवंत फूड प्लाझा

3. पवार भेळ

शहरातील नगरपालिकेच्या 20 शाळा ,खाजगी प्राथमिक 34 शाळा ,सर्व 17 माध्यमिक विद्यालय यांनी वसुंधरा महोत्सवांमध्ये उत्तम कामगिरी पार पाडल्याबद्दल सर्व शाळांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

यावेळी कार्यक्रमास मुख्याध्यापक, मार्गदर्शक शिक्षक ,पालकांची उपस्थिती उत्तम होती.

कोव्हीड-19 (कोरोनाचे) सर्व नियम पाळून हा कार्यक्रम पार पडला.

Leave a Reply