Headlines

“बाळासाहेब त्यांचे वडील असले तरी त्यांच्यापेक्षा जास्त आमचा अधिकार आहे त्यांच्यावर”; उद्धव ठाकरेंना मनसे नेत्याचं प्रत्युत्तर | We have more right on Balasaheb Thackeray even though he is father of Uddhav says mns leader bala nandgaonkar scsg 91

[ad_1]

बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे वडील असले तरी त्यांनी कर्मच्या माध्यमातून आम्हाला जे दिलं आहे ते पाहता आमच्या त्यांच्यावर जास्त अधिकार आहे, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर नांदगावकर यांनी बाळासाहेब हा एक विचार असल्याने त्यावर आमचाही अधिकार असल्याचं म्हटलंय. मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं.

नक्की पाहा >> Video: “…नाहीतर आमचाच ‘कार्यक्रम’ झाला असता”; गळ्यावरुन हात फिरवत जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंचं विधान

उद्धव काय म्हणाले?
मुलाखतीमध्ये उद्धव यांनी बंडखोरांना बाळासाहेबांच्या नावाचा आधार घेण्याशिवाय पर्याय नाही असंही म्हटलंय. “बाळासाहेबांना त्यांनी मानसन्मान दिलाच पाहिजे. नाही दिला तर लोक जोडे मारतील. कोणीही असला आणि तो बाळासाहेबांच्या विरोधात बोलला तर लोक त्याला जोड्याने हाणतील. म्हणून त्यांना बाळासाहेब पाहिजे पण ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडायचं. माझं आव्हान आहे की ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडून दाखवाच. मात्र ते करताना माझ्या वडिलांचा फोटो लावून मतं मागू नका,” असं उद्धव यांनी बंडखोरांना म्हटलंय.

नक्की वाचा >> भाजपाला शिवसेना का संपवायची आहे? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, “आता त्यांना…”

“प्रत्येकाला आई-वडील असतात. मला माझ्या आई-वडीलांबद्दल आदर आहे तसा प्रत्येकाला असला पाहिजे. त्यांनी स्वत:च्या आई-वडिलांचे फोटो लावावेत आणि मतं मागावी. आज माझ्या दुर्देवाने माझे आई-वडील माझ्यासोबत नाहीत पण ते नेहमी माझ्यामध्ये आहेत. पण ज्यांचे ज्यांचे आई-वडील सुदैवाने त्यांच्यामध्ये आहेत त्यांना मी म्हणेन की असा आशीर्वाद पुन्हा मिळू शकत नाही. त्यांना घेऊन सभा घ्याव्यात, भाषणं करावीत आणि मतं घ्यावीत. माझे वडील का चोरताय?” असा प्रश्न उद्धव यांनी बंडखोर शिंदे गटाला केलाय.

नक्की वाचा >> ‘खंजीर खुपसला’ टीकेवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर; म्हणाले, “जे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बेड्यांमध्ये…”

“माझ्या वडिलांच्या फोटोचा, नावाचा आधार घ्यावा लागतो याचा अर्थ काय की तुमच्यात कर्तृत्व नाही. तुमच्यात हिंमत नाही. तुम्ही मर्द नाही आहात. तुम्ही विश्वासघातकी आहात. माझा तर विश्वासघात केला पण लोकांचा विश्वासघात करताना बाळासाहेबांच्या नावाने संभ्रम कशाला निर्माण करताय. तुमचा मर्दाचा चेहरा घ्या समोर आणि मागा मतं,” असंही उद्धव बंडखोरांबद्दल बोलताना म्हणालेत.

नांदगावकर काय म्हणाले?
याचसंदर्भात नांदगावकर यांना प्रश्न विचारण्यात आला असताना त्यांना बाळासाहेब हे एक व्यक्ती नसून विचार असल्याचं म्हटलं. “बाळासाहेबांनी त्यांना जन्म दिला पण आमच्यासारखे लाखो कार्यकर्ते आहेत ज्यांना कर्म देऊन त्यांनी जन्म दिलेला आहे. ते त्यांचे वडील असले तरी त्यापेक्षा जास्त आमचा अधिकार आहे त्यांच्यावर,” असं नांदगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. बाळासाहेबांबद्दल बोलताना नांदगावकर यांनी, “कर्माने त्यांनी आम्हाला मोठं केलं आहे. बाळासाहेब हा एक विचार आणि संस्कार आहे. ते आम्हाला पुढे घेऊन जाणारं मार्गदर्शक नेतृत्व होतं. निश्चितपणे प्रत्येकाचा त्याच्या संस्थेवर अधिकार आहे पण विचारांवर आमचाही अधिकार आहे,” असं नांदगावकर यांनी स्पष्ट केलं.

राज उद्धव दोघांचीही हिंदुत्वाची भूमिका…
“हिंदुत्वाची भूमिका राज ठाकरे मांडत असतानाच उद्धव ठाकरेही हिंदुत्वाची भूमिका मांडताना दिसतायत. त्याकडे कसं पाहता?” या प्रश्नावर, “प्रत्येकाला आपआपला पक्ष पुढे कसा घेऊन जायचा याचा अधिकार आहे. आम्ही आमची भूमिका घेऊन पुढे जातोय. त्यांनी त्यांची भूमिका घ्यावी,” असं नांदगावकर म्हणाले.

नक्की पाहा >> Video: ओबीसी आरक्षणाबद्दल बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ‘हा’ शब्द उच्चारताच सभागृहात पिकला हशा

शिंदे गट हिंदुत्वाला पुढे नेत आहे का?
“शिंदे गटाचे एकनाथ शिंदे हे खरोखर हिंदुत्वाचा पुढे घेऊन जात आहेत का?” असा प्रश्न विचारण्यात आला असताना राज ठाकरेच हे बाळासाहेबांचे खरे वारसदार असल्याचं नांदगावकर म्हणाले. “राज ठाकरे हे बाळासाहेबांचे खरे वारसदार आहेत. हे मी आज नाही तर वर्षानूवर्षे बोलत आलोय. पुढेही बोलत राहणार,” असं नांदगावकर म्हणाले. तसेच, “यामागील कारण असं आहे की त्यांच्या अंगाखांद्यावर वाढलेले आहेत. त्यांना त्यांची (बाळासाहेबांची) भावना आणि भूमिका पूर्णपणे ठाऊक आहेत. आता मागचं सरकार होतं त्यावेळी ते सरकार आम्ही तशी भूमिका घेऊन चाल्याचं दाखवत होते.
पण लोकांना ते भावत नव्हतं. राज बोलतात ते लोकांना भावतं. आता जे सरकार आलंय ते बाळासाहेबांच्या विचाराने पुढे जाईल अशी अपेक्षा आम्ही धरुन चालेलो आहोत. कारण ते ही तसं बोलतायत. पहिल्या १५ दिवसांमध्ये नाही कळणार,” असंही नांदगावकर म्हणाले.

नक्की वाचा >> ‘सत्ता होती तेव्हाची’ आणि ‘सत्ता गेल्यानंतर’च्या मुलाखतीमधील फरक दाखवत निलेश राणेंनी सेनेला केलं लक्ष्य; कॅप्शन चर्चेचा विषय

राज परखडपणे बोलतात…
“राज ठाकरे नेहमीच अत्यंत स्पष्ट आणि परखडपणे आपली मतं मांडतात. त्यांच्या जे पोटात आहे तेच ओठात असतं. त्यामुळे ते आपली भूमिका ठापणे मांडत असतात. त्यांनी मुलाखतीत तशीच भूमिका तशाच पद्धतीने मांडली. अनेकांना ती भूमिका फार आवडल्याचं दिसत आहे. ही गोष्ट खरी आहे त्यांच्या स्पष्टवक्तेपणेमुळे लोकांना त्यांच्या मनाचा ठाव घेता येतो. त्यांनी दिलेलं भाषण, मुलाखत किंवा वक्तव्य असो किंवा त्यांनी लिहिलेलं पत्रं असो
ते नेहमीच चर्चेत राहतं,” असंही नांदगावकर म्हणाले.

नक्की वाचा >> “बंडखोरांनी त्यांच्या आई-वडिलांना घेऊन सभा घ्याव्यात, भाषणं करावीत आणि…”; उद्धव ठाकरेंचं शिंदे गटाला थेट आव्हान

त्या शिवसैनिक आणि मनसैनिकामध्ये फरक नाही
“मी बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आहे. तोच विचार आता राज ठाकरे महाराष्ट्राभरात नेत आहेत. बाळासाहेबांच्या विचाराचा शिवसैनिक आणि राज ठाकरेंच्या विचाराचा मनसैनिक यांच्यात काहीही फरक दिसत नाही,” असंही नांदगावकर म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *