Aus vs Eng 3rd Odi : ऑस्ट्रेलियन खेळाडूच मैदानावर अनोख सेलिब्रेशन, VIDEO झाला व्हायरल


Australia vs England, 3rd ODI: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये (Australia Vs England) 3 सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडने (Travis Head) शतक ठोकलं आहे. हे शतक ठोकून त्याने अनोख सेलिब्रेशन केलं आहे. या सेलिब्रेशनची सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. 

अनोख सेलिब्रेशन

तिसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेड (Travis Head) दीड शतकी खेळी केली आहे. हेडने 130 बॉलमध्ये 152 धावा ठोकल्या आहेत. या खेळीत त्याने 16 चौकार आणि 4 गगनचुंबी षटकार ठोकले आहेत. या त्याच्या धुवाधार खेळीने ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर (Australia Vs England) मोठ्या धावांचा डोंगर उभारला आहे. 

व्हिडिओत काय?

ट्रॅव्हिस हेडने (Travis Head) इंग्लंडविरूद्ध शतक ठोकताच अनोख सेलिब्रेशन केले आहे. हेडने शतकादरम्यान अनेक उत्कृष्ट शॉट्स खेळले, मात्र तरीही चर्चा त्याच्या खास सेलिब्रेशनची झाली. हेडने शतक ठोकून बॅटला आपल्या दोन्ही हातात घेऊन त्याला एका बाळासारखा झुळवलं आहे.या संदर्भातला व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. 

खास सेलिब्रेशन मागचं कारण काय?  

ट्रेविस हेड (Travis Head) नुकताच वडील झाला आहे. त्याच्या घरी एका मुलीचा जन्म झाला आहे. त्यामुळे त्याने इंग्लंडविरूद्ध शतक ठोकून ते आपल्या मुलीला समर्पित केले आहे. ट्रेविस हेडने वनडेमध्ये तिसऱ्यांदा शतक झळकावले आहे. सलामीवीर म्हणून त्याचे हे दुसरे शतक आहे.

इंग्लंडसमोर 348 धावांचे आव्हान 

हेडने (Travis Head) सलामीवीर डेव्हिड वॉर्नरसोबत (David Warner) शानदार भागीदारी केली. दोघांमध्ये 269 धावांची भागीदारी झाली होती. या मोठ्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलिया मोठा धावांचा डोंगर उभारू शकली आहे. हेडने 130 बॉलमध्ये 152 धावा ठोकल्या आहेत, तर वॉर्नरने 102 बॉलमध्ये 106 धावा केल्या आहे. या दोघांच्या मोठ्या खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 4 विकेट गमावून 347 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे इंग्लंडसमोर  348 धावांचे आव्हान असणार आहे. 

दरम्यान तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने (Australia) 2-0 ने आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा विचार ऑस्ट्रेलिया करते आहे. तर इंग्लंड (England) हा सामना जिंकून व्हाईट व्हाश पासून वाचण्याचा प्रयत्न करत आहे. Source link

Leave a Reply