Astrology Tips: रक्षाबंधनला बहिणीला राशीनुसार द्या असं गिफ्ट, जाणून घ्या


Rakshabandhan: रक्षाबंधन हा श्रावण महिन्यातील महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते. तसंच ओवाळून रक्षण करण्याचं वचन मागते. यानंतर भाऊ बहिणीला तिच्या आवडीनुसार गिफ्ट देतो. पण कधी कधी गिफ्ट निवडताना संभ्रम असतो. नेमकं काय गिफ्ट दिलं तर बहीण खुश होईल, असा प्रश्न पडतो. तर तुमच्या राशीनुसार बहिणीला गिफ्ट देऊ शकता. चला तर मग जाणून घेऊयात कोणतं गिफ्ट द्यायचं.

मेष – या राशीच्या लोकांनी बहीण लहान असेल तर तिला खेळाशी संबंधित वस्तू द्यावी. पण जर बहीण मोठी असेल तर तिला स्मार्ट वॉच किंवा आरोग्याशी निगडित इलेक्ट्रॉनिक वस्तू द्या. जेणेकरून तिला तिच्या तब्येतीची नोंद ठेवता येईल आणि निरोगी राहता येईल.

वृषभ – वृषभ राशीच्या लोकांनी बहिणीला खुश करण्यासाठी एखादे चांगले पेंटिंग किंवा घर सजावटीशी संबंधित वस्तू द्यावी. बहीण लहान असेल आणि शिकत असेल तर तिला पुस्तकेही देता येतील.

मिथुन – या राशीच्या लोकांना ग्रीन शेडचे कपडे द्यावेत. बहिणीचे लग्न झालेलं असेल तर गृहोपयोगी वस्तू देऊ शकता.

कर्क – कर्क राशीच्या लोकांनी आपल्या बहिणीला  प्रवासाशी संबंधित गोष्टी द्याव्यात. याशिवाय बँड, घड्याळ, अंगठी, ब्रेसलेट, बांगडी इ. वस्तू द्यावा.

सिंह – या राशीच्या लोकांना आवडीचे खाद्यपदार्थ द्यावेत किंवा क्रोकरी सेट इ. द्यावा.

कन्या – कन्या राशीच्या लोकांनी आपल्या बहिणीसाठी इलेक्ट्रॉनिक वस्तू गिफ्ट म्हणून द्याव्यात. बहीण शाळेत असेल तर दप्तर, जेवणाचा डबा आणि पेन इत्यादी देऊ शकतात.

तूळ – या राशीच्या लोकांनी बहिणीला पेंटिंग द्यावे. जर बहीण लहान असेल तर तिला रंगपेटी किंवा वॉटर कलर द्या, जेणेकरून ती चित्र रंगवू शकेल.

वृश्चिक – वृश्चिक राशीच्या बहिणीला नितांत गरज असलेली वस्तू द्या. अशा स्थितीत तिला काय हवे आहे ते विचारावे आणि वस्तू द्यावी. सोबत मिठाईही द्यायला हवी.

धनु – या राशीच्या लोकांनी मोबाईल फोन, इअर फोन इत्यादी गोष्टी द्याव्यात. बहीण बाहेर गावी राहत असेल तर तिची नक्की भेट घ्या.

मकर – मकर राशीच्या लोकांनी बहिणीला एखादी गोष्ट कायमस्वरुपी स्मरणात राहील अशी वस्तू द्यावी. फोटो अल्बम, फोटो फ्रेम, कॅमेरा इत्यादी गोष्टी द्यावा. अँटिक वस्तू देणं चांगलं राहील.

कुंभ – सर्वप्रथम आपल्या बहिणीच्या सुखसोयींची काळजी घ्या. तिला काही अडचण असेल तर तिच्या येण्याची व्यवस्था करा. तुम्ही धर्माशी संबंधित धार्मिक पुस्तक किंवा धार्मिक प्रवासासाठी व्यवस्था करू शकता.

मीन – मीन राशीच्या लोकांनी बहिणीला आवडती भेटवस्तू द्या. ती मागणी करत असेल तर ती वस्तू द्यायलाच हवी. कपडे देखील भेट देऊ शकतात.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)Source link

Leave a Reply