Headlines

विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर

[ad_1]

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांची अपेक्षेप्रमाणे निवड झाली. या निवडणुकीत नार्वेकर यांना १६४ मते मिळाल्याने राज्यातील सत्तानाटय़ात शिवसेनाअंतर्गत सुरू असलेल्या  सत्तासंघर्षांत भाजप व शिंदे गटाने बाजी मारीत पहिला अंक जिंकला. यामुळे सोमवारी होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावाचा फक्त औपचारिकता शिल्लक राहिली.

आवाजी मतदानाने झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे राहुल नार्वेकर यांना १६४, तर शिवसेनेचे राजन साळवी यांना १०७ मते मिळाली. तीन आमदार तटस्थ राहिले. निवडीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी नेते अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, नाना पटोले व शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांनी सन्मानपूर्वक नार्वेकर यांना अध्यक्षांच्या खुर्चीवर विराजमान केले. आतापर्यंत विधानसभा अध्यक्षपद भूषविलेल्यांमध्ये नार्वेकर हे सर्वात तरुण आहेत.  राज्याच्या स्थापनेपासून अध्यक्षपदी निवड होणारे नार्वेकर हे १६वे अध्यक्ष आहेत.

अध्यक्षपदी निवड झाल्यावर नार्वेकर यांनी सर्वाचे आभार मानले व सर्वाना समान न्याय देण्याची ग्वाही दिली. संसदीय लोकशाहीच्या वाटचालीत वैशिष्टय़पूर्ण स्थान असलेल्या महाराष्ट्र विधानसभा या राज्यातील सर्वोच्च सभागृहाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्द्दल सर्वाचे आभार मानताना, सभागृहातील कामकाजाचा क्षण आणि क्षण शोषित, वंचितांच्या कल्याणासाठी खर्च करू, असेही त्यांनी सांगितले. विधानमंडळ हे राज्यातील तेरा कोटी जनतेच्या इच्छा-आकांक्षांचे प्रतीक आहे. लोकप्रतिनिधींमार्फत या इच्छा-आकांक्षा विविध संसदीय आयुधांच्या माध्यमातून सभागृहात मांडल्या जाणे आणि त्यानुसार निर्णयप्रक्रियेचे चक्र गतिमान राहणे आवश्यक आहे. मात्र सभागृहात विधेयके चर्चेविना संमत होणे अयोग्य असून सभागृहात दर्जेदार चर्चा व्हावी, परिणामकारक वैधानिक कामकाज होण्यावर आपला भर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक िनबाळकर हे नार्वेकर यांचे सासरे. यामुळेच राज्यातील उभय सभागृहांच्या पीठासीन अधिकारीपदी सासरे व जावयाची जोडी काम करणार आहे. सासरे-जावई जोडीचा अनेकांनी उल्लेख केला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने नाना पटोले यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून अध्यक्षपद रिक्त होते. आधी महाविकास आघाडीतील समन्वयाचा अभाव, नंतर राज्यपालांच्या आक्षेपामुळे अध्यक्षपदाची निवडणूक होऊ शकली नव्हती.

निवडणुकीत १० आमदार गैरहजर

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत १० आमदार गैरहजर होते. समाजवादी पक्षाचे दोन तर एमआयएमचा एक आमदार असे तीन जण तटस्थ राहिले.  विधानसभेची सध्या सदस्यसंख्या ही २८७ आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे सध्या तुरुंगात आहेत.

 २७१ जणांनी प्रत्यक्ष मतदानात भाग घेतला. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मतदान केले नाही. राष्ट्रवादीचे दोन आमदार विलंबाने सभागृहात पोहचले.  राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे यांच्या आईचे नुकतेच निधन झाल्याने ते उपस्थित नव्हते. तर बबनदादा शिंदे हे बऱ्याच दिवसांपासून परदेशात असल्याने  ते उपस्थित राहू शकले नाहीत. दिलीप मोहिते, अण्णा बनसोडे, नीलेश लंके हे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार वेळेत विधान भवनात पोहोचू शकले नाहीत. 

मुक्ता टिळक व लक्ष्मण जगताप या भाजपच्या दोन आमदारांनी प्रकृती चांगली नसतानाही राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीत रुग्णवाहिकेतून येऊन मतदानात भाग घेतला होता. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मात्र दोघेही अनुपस्थित होते.

काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे व जितेन अंतापूरकर हे घरगुती कारणांमुळे  उपस्थित नव्हते. एमआयएमचे मुफ्ती इस्माईल हे मतदानासाठी फिरकले नाहीत.

विश्वासदर्शक ठरावाची आज औपचारिकता 

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संख्याबळाचा अंदाज आल्याने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाची उद्या औपचारिकता असेल.

भाजप, शिवसेनेतील शिंदे गट, छोटे पक्ष व अपक्षांनी स्थापन केलेल्या सरकारला विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्याचा निर्देश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिला होता. विधानसभा अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांना १६४ तर महाविकास आघाडीचे राजन साळवी यांना १०७ मते मिळाली. सत्तेसाठी १४५ हा  आकडा आवश्यक असतो. सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाला १६४ आमदारांचा पाठिंबा मिळाला. यामुळेच सोमवारचा विश्वासदर्शक ठराव ही औपचारिकता ठरणार आहे. यामुळेच सत्ताधारी भाजप व शिंदे गटाचे आमदार अध्यक्षपदाची निवडणूक पार पडल्यावर निर्धास्त झाले.

विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणुकीत उमेदवारांच्या नावांचे प्रस्ताव पुकारण्यात आले असता सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाकडून आवाजी मतदानाने निवड करण्याची मागणी करण्यात आली. विरोधकांकडून मतदानाची मागणी करण्यात आली. त्यावर उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मतदान होईल, असे जाहीर केले.

शिवसेना विधिमंडळ पक्षातील फूट व किंवा वास्तववादी चित्र समोर आणण्याकरिताच मतदानाची मागणी महाविकास आघाड़ीकडून करण्यात आली होती. अध्यक्षपदासाठी झालेल्या मतदानातून शिवसेनेचे कोणता आमदार कोणत्या गटात आहे हे स्पष्ट झाले.

विधिमंडळातील शिवसेना कार्यालय सील

मुंबई : नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असलेले आमदार यांच्यात विधिमंडळ शिवसेना पक्षाच्या कार्यालयावरून संघर्ष होऊ नये यासाठी विधान भवनातील शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालय रविवारी सकाळी सील करण्यात आले.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही गट प्रथमच समोरासमोर येणार होते. शिंदे गटातील आमदार व शिवसेनेचे आमदार हे विधिमंडळ पक्ष कार्यालयाकडे गेल्यास त्यातून संघर्ष होण्याचा धोका होता. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने शनिवारीच विधिमंडळ सचिवालयाचे या धोक्याकडे लक्ष वेधत शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालय सील करण्याची मागणी केली होती.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *