Asia Cup मधून जसप्रीत बुमराह बाहेर, अनुभवी खेळाडूला डावलून ‘या’ बॉलर्सना संधी


मुंबई : आशिया कपआधी टीम इंडियासाठी वाईट बातमी आहे. जसप्रीम बुमराह दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर झाला आहे. बुमराहच्या जागी टीम इंडियात नवख्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. आशिया कपसाठी टीम इंडियात अनुभवी फलंदाज आहेत. पण बॉ़लर्समध्ये केवळ भुवनेश्वर कुमारकडे दाणगा अनुभव आहे. अर्शदीप आणि रवि बिश्नोई आणि आवेश खानकडे म्हणावा तेवढा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनुभव नाही. याचा फटकाही टीम इंडियाला बसू शकतो. त्यामुळे कर्णधार रोहित शर्माला खूप अलर्ट राहण्याची आवश्यकता आहे.

आशिया कपसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार अर्शदीप सिंह, आवेश खान.

निवड समितीकडे बुमराहला दुखापत झाल्यानंतर त्याच्या जागी निवड करण्यासाठी शमीचा उत्तम पर्याय होता. त्याच्याकडे दाणगा अनुभवही आहे. मात्र शमीला डावलून नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. बॉलर्समध्ये केवळ भुवनेश्वर कुमारकडे अनुभव आहे. भुवी देखील फिटनेसमध्ये मार खातो. त्याच्या संपूर्ण करिअरमध्ये तो सगळ्यात जास्त दुखापतीने त्रस्त झाल्याचे किस्से आहेत. 

अर्शदीप आणि आवेशकडे फारसा अनुभव नाही. तर वेस्ट इंडिज दौऱ्यात आवेश खानच्या खराब कामगिरीचा टीम इंडियाला फटका बसला होता. निवड समिती आवेश खान ऐवजी मोहम्मद शमीला संधी देऊ शकले असते. त्याचा फायदा आशिया कपसाठी झाला असता, मात्र तसं न झाल्याने अनेक दिग्गज आणि क्रिकेटप्रेमींनी टीका केली आहे. 

टीममध्ये 4 स्पिनर्सला संधी देणं हा निवड समितीचा निर्णय आश्चर्यचकित करणारा आहे. 31 वर्षांचा शमी सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आयपीएलमध्ये गुजरात टीमकडून खेळताना त्याने चांगली कामगिरी केली होती. टी 20 वर्ल्ड कपनंतर त्याला टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारशी संधी मिळाली नाही. आता टी 20 वर्ल्ड कपसाठी पुन्हा त्याला संधी मिळणार की नाही याबाबत शंका आहे. 

टी 20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने कर्णधार रोहित शर्मा टीमची बांधणी करत आहे. त्यामुळे नव्या खेळाडूंना आजमावत आहे. टी 20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी चांगली टीम निवडण्यासाठी रोहित अनेक खेळाडूंना संधी देत आहे. पण अशा परिस्थितीमध्ये अनुभवी खेळाडूंकडे दुर्लक्ष होऊ नये. त्याचा फटका टीमला बसू शकतो असं काही दिग्गज क्रिकेटपटूंचं म्हणणं आहे. 27 ऑगस्टपासून आशिया कप सुरू होत आहे. टीम इंडियाच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आशिया कपसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार अर्शदीप सिंह, आवेश खान.Source link

Leave a Reply