Headlines

Asia Cup स्पर्धेसाठी पाकिस्तानचा मोठा डाव, टीम जाहीर करत भारताच्या जावयााला केलं बाहेर

[ad_1]

Asia Cup 2022: आशिया कप स्पर्धेला संयुक्त अरब अमीरातमध्ये 27 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका हे संघ असणार आहेत. जेतेपद पटकावण्यासाठी पाचही संघानी कंबर कसली आहे. पण पाकिस्तान संघाने आतापासूनच आशिया कप स्पर्धेसाठी मोर्चेबांधणी केली आहे. पाकिस्तान आशिया कप स्पर्धेसाठी संघ जाहीर केला आहे. मात्र वेगवान गोलंदाज हसन अलीला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. हसन अली टी 20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानसाठी खलनायक ठरला होता. हसन अलीमुळे पाकिस्तान संघाला टी 20 वर्ल्डकपच्या उपांत्यफेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. 

खराब फॉर्मात असलेल्या वेगवान गोलंदाज हसन अली ऐवजी नसीम शाहाची संघात निवड करण्यात आली आहे. तर दुखापतग्रस्त असूनही वेगवान गोलंदाज शाहीन शाह अफरिदीची संघात निवड केली आहे. सध्या दुखापतीमुळे शाहीन शाह अफरीदी श्रीलंका दौऱ्यात दुसरी कसोटी खेळला नाही. पाकिस्तानच्या निवड समितीने अफरीदीची निवड दोन्ही संघात केली असून ट्रेनर आणि फिजियोच्या देखरेखीखाली आहे. दुसरीकडे पाकिस्तानी निवडकर्त्यांनी फलंदाज शान मसूद संघात स्थान दिलेलं नाही. मसूदने श्रीलंका विरुद्धच्या कसोटी सामन्यात शतकी खेळी आहे. 

मुख्य निवडकर्ते मुहम्मद वसीम यांनी सांगितलं की, “आम्ही आवश्यक बदल केले आहेत. आमच्यासाठी आशिया कप महत्त्वाचा आहे. यासाठी आम्ही कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षकांच्या सल्लामसलत केल्यानंतर सर्वोत्तम खेळाडूंची निवड केली आहे.”  खेळाडूचं ट्रेनिंग शिबीर 11 ऑगस्टपासून सुरु होईल. त्यात दोन 50 षटकांचे सामने खेळले जातील. नेदरलँडविरुद्थ 16 ते 21 ऑगस्ट दरम्यान वनडे सीरिज खेळली जाईल. त्यानंतर 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान आशिया कप स्पर्धा असेल. 

पाकिस्तानचा संघ
बाबर आजम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमां, हारिस रऊफ, खुशदिल शाह, हैदर अली, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, आसिफ अली, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह अफरीदी, शाहनवाज दहानी और उस्मान कादिर.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *