असं करायला नाही पाहिजे होतं; समंथा- नागा चैतन्यच्या नात्यात ‘हे’ घडून गेलं आणि त्याचा कोणाला थांगपत्ताही नाही


मुंबई : दक्षिणेकडील सिनेमा विश्वात नावाजलेल्या अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य यांची जोडी म्हणजे प्रत्येकाला हेवा वाटेल अशीच होती. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या या जोडीकडे पाहताना आपलाही जोडीदार आपल्यावर इतकाच प्रेम करणारा हवा, अशीच इच्छा तरुणींनी व्यक्त केली.

सर्वकाही सुरळीत सुरु असताना अचानकच या दोघांच्याही नात्यात असणारे वाद चव्हाट्यावर आले आणि एके दिवशी अचानकच त्यांनी घटस्फोट जाहीर केला.

समंथानं सोशल मीडियाच्या माध्यमातून घटस्फोटाची माहिती देणारी एक पोस्ट केली. कालांतरानं तिनं ही पोस्ट डिलीटही केली. नागा चैतन्यची आठवणही नको, याच भावनेनं तिनं लग्नातली साडी परत पाठवण्यापासून ते अगदी त्याला अनफलो करण्यापर्यंतची कामं केली.

समंथा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आता आयुष्यात पुढे जाण्याचा विचार करत असल्याकडे लक्ष वेधलं. पण, खरंच तिला हे इतक्या सहजपणे शक्य होतं? समंथानं नागा चैतन्यला अनफॉलो केलं. पण, त्यानंतर मात्र तिनं जी पोस्ट केली त्यातून मात्र ही अभिनेत्री किती मोठा संघर्ष करतेय हे जाणवलं.

सोशल मीडिया वर आपल्या जीवनातील बरेच क्षण सर्वांसमोर उघड असतात. अशा परिस्थितीमध्ये प्रेम करणाऱ्या पण सोबत नसलणाऱ्या व्यक्तीला अनफॉलो करणं अनेकदा चांगला पर्याय ठरतं. ज्यामुळं ती व्यक्ती वारंवार आपल्यासमोर येत नाही.

त्यांच्या जीवनातील घडामोडींपासून आपण दूर असतो. अशा परिस्थितीमध्ये नात्यात असणारी मैत्री मात्र गमावली जाऊ नये हाच मुख्य हेतू.

Samantha Ruth Prabhu makes SHOCKING statement after divorce from Naga  Chaitanya

पण, गोष्टी फॉलो- अनफॉलोपुरताच थांबत नाहीत. तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात काय घड आहे, याचा विचार बंद करणं इथं मदतीचं ठरतं. अन्यथा त्यात विचारानं आणि भूतकाळानं तुम्ही तणाव, दडपण आणि नैराश्याचा सामना करता.

नागा चैतन्यशी वेगळं होणं समंथासाठी अर्थात सोपं नसेल. पण, ती दाखवते तितकी खरंच धीट झालीये की तिच्या मनात अजूनही भावनांचा काहूर आहे हे मात्र ती स्वत:च जाणते.Source link

Leave a Reply