Headlines

अरेच्चा…! Oscar विजेता CODA म्हणजे ‘या’ बॉलिवूड चित्रपटाची कॉपी

[ad_1]

मुंबई : चित्रपटांच्या दुनियेत काही पुरस्कार सोहळ्यांना मानाचं स्थान आहे. याच मानाच्या स्थानात अग्रस्थानी येतो तो म्हणजे ऑस्कर. नुकताच यंदाचा ऑस्कर 2022 (Oscars) पुरस्कार सोहळा पार पडला. जिथं बहुविध चित्रपटांना पुरस्कार देत कलाकारांचा गौरव करण्यात आला. 

यंदाच्या वर्षात ‘कोडा’ CODA या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळाला. 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या या कॉमेडी ड्रामा प्रकारातील चित्रपटाची पटकथा सियान हेदेरनं लिहिलेली सोबतच चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं होतं. 

हा चित्रपट 2014 मध्ये आलेल्या La Famille Bélier चा इंग्रजी रिमेक असल्याचं म्हटलं गेलं. पण, लक्ष देऊन पाहिल्यास हा चित्रपट 1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या सलमान खान याच्या एका चित्रपटाचा रिमेक असल्याचं कळतं. 

तुम्ही CODA पाहिला असेल किंवा नसेल, पटकथेच्या आधारे लगेचच तुम्हाला हा कोणता बॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे हे लक्षात येईल. 

1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या, संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनात साकारलेल्या ‘खमोशी- द म्युझिक’ या चित्रपटाचा हा रिमेक. सलमान खान, मनिषा कोईराला, नाना पाटेकर यांच्या यात महत्त्वाच्या भूमिका होत्या. 

या चित्रपटामध्ये ऐकू आणि बोलू न येणाऱ्या पालकांची मुलची अॅनी (मनिषा कोईराला) गायिका बनण्याचं स्वप्न पाहते असं कथानक आहे. आता उरलेली कथा काय हे बहुधा तुम्हाला ठाऊक असेलच.

मुद्द्याची गोष्ट अशी, की एखाद्या बॉलिवूड चित्रपटावरून हॉलिवूडपट साकारावा आणि त्याला थेट ऑस्कर मिळावा ही तशी पहिलीच वेळ…. नाही का? 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *