अरबाजची गर्लफ्रेंड जॉर्जियाचा भर रस्त्यात कारनामा, नको ते करून बसली


मुंबई : दिग्दर्शक आणि अभिनेता अरबाज खानची  (Arbaaz Khan)  गर्लफ्रेंड कायमच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असते. गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani) सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असते. आपले सगळे अपडेट चाहत्यांना मिळावेत यासाठी ती इंस्टाग्रामवर अनेक पोस्ट शेअर करत असते. आता तिने भर रस्त्यात असं काही काम केलंय की, ज्याच्यामुळे अरबाजलाच काय तर तिच्या चाहत्यांना देखील मान खाली घालावी लागणार आहे. 

जॉर्जियाचा भर रस्त्यात ‘कार’नामा

व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, जॉर्जिया (Giorgia Andriani) कारमधून अचानक खाली उतरते. तेवढ्यातच इंग्लिश गाणं अचानक वाजू लागतं. 

या दरम्यान जॅकेट आणि शॉर्ट्स घालताना दिसत आहे. या गाण्यावर तिने असे लटके-झटके दिले आहेत की, सगळ्यांच्याच हृदयाचा ठोका चुकला आहे. 

जॉर्जियाचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर याची खूप चर्चा आहे. 

पुन्हा पुन्हा पाहिला गेला व्हिडीओ 

हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करताना जॉर्जियाने कॅप्शनमध्ये लिहिले, रस्त्याच्या मधोमध मजा. चाहते या व्हिडिओवर उत्स्फूर्त कमेंट करत आहेत.

एका यूजरने लिहिले की, तू खूप हॉट आणि सुंदर दिसत आहेस. छान अभिनय केला. दुसर्‍या चाहत्याने मात्र यावर टिप्पणी केली आहे. याशिवाय युजर्सनी कॉमेंट सेक्शनमध्ये फायर इमोजी जबरदस्त शेअर केले आहेत.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की अरबाज खान त्याची पत्नी मलायका अरोराशी घटस्फोट घेतल्यानंतर जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे. दोघांच्या वयात 22 वर्षांचे अंतर आहे.

जॉर्जिया 30 वर्षांची आहे आणि अरबाज खान 52 वर्षांचा आहे. दोघेही अनेकदा कार्यक्रमात किंवा पार्टीत एकत्र स्पॉट केले जातात. सोशल मीडियावर जॉर्जियाचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडतात अशी माहिती आहे.Source link

Leave a Reply