अरारा खतरनाक! अभिनेत्रीपेक्षा कमी नाही मुंबईच्या स्टार खेळाडूची गर्लफ्रेंड, फोटो तर पाहा


मुंबई : मुंबई टीममधील स्टार खेळाडूच्या गर्लफ्रेंडची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. मेगा ऑक्शनमध्ये बेबी डिव्हिलियर्स नावाने प्रसिद्ध असलेल्या डेवाल्ड ब्रेविसची चर्चा सध्या आहे. त्याची गर्लफ्रेंडही सध्या चर्चेत आली आहे. आयपीएलच्या सुरुवातीपासून मुंबईची खराब सुरुवात झाली. 

मुंबई टीम सलग 4 सामने पराभूत झाली. मात्र बेबी डिव्हिलियर्सची चर्चा जगभरात रंगली. दक्षिण आफ्रिका युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेविसने पहिल्यांदाच आयपीएलमध्ये पदार्पण केलं. 

 डेवाल्ड ब्रेविसला ज्युनियर एबी डिव्हिलियर्स म्हणून ओळखलं जातं. त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव लिंडी मारी आहे. तिचे सोशल मीडियावर 13 हजार फॉलोअर्स आहे. 

लिंडा मारी सोशल मीडियावर जास्त डेवाल्ड ब्रेविससोबतचे फोटो शेअर करते. तिचे डोळे आणि सौंदर्य मोहक करणारं आहे. या दोघांच्या फोटोंमधून दिसून येतं त्यांचं एकमेकांवर किती प्रेम आहे. इन्स्टावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये पाहू शकता ती खूप सुंदर दिसते. तिचे डोळे खूप वेगळे आहेत. 

डेवाल्ड ब्रेविसचा जन्म 29 एप्रिल 2003 मध्ये जोहानिसबर्गमध्ये झाला. ब्रेविसला बालपणापासून क्रिकेटचं वेड होतं. दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सच्या हाताखाली त्याने क्रिकेटचे धडे घेतले आहेत. 

डेवाल्ड ब्रेविस 20 लाख रुपयांच्या किमतीवर मेगा ऑक्शनमध्ये गेला होता. CSK, पंजाबची त्याला टीममध्ये घेण्यासाठी चढाओढ सुरू होती. अखेर मुंबईने 3 कोटी रुपये देऊन त्याला आपल्या टीममध्ये घेतलं. 

डेवाल्ड ब्रेविसने कोलकाता विरुद्धच्या सामन्यातून आयपीएलमध्ये डेब्यू केलं. डेवाल्ड ब्रेविस याआधी अंडर 19 वर्ल्ड कप 2022 मध्ये त्याने सर्वांची मनं जिंकली होती. या टूर्नामेंटमध्ये तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याने 6 सामन्यात 506 धावा त्याने केल्या. त्याने दोन शतक आणि 3 अर्धशतक ठोकले होते. 

 Source link

Leave a Reply