Anurag Kashyap डिप्रेशनचा बळी, तीन वेळा गेलाय रिहॅब अन् Heart Attack!


मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap)  हा लोकप्रिय दिग्दर्शकांपैकी एक आहे. अनुराग कश्यप त्याच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखला जातो. कोणत्याही मुद्द्यावर असलेले त्याचे मत तो स्पष्टपणे मांडत असतो. सध्या अनुराग त्याच्या आगामी ‘अल्मोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत’ (Almost pyaar with DJ Mohabbat) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र, या चित्रपटाच्या चर्चेदरम्यान अनुरागनं स्वत:बाबत एक मोठा खुलासा केला आहे. हे ऐकल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. (anurag kashyap reveals he was in depression) 

हेही वाचा : Malaika Aroraसोबत अरबाजच्या गर्लफ्रेंडचं आहे असं नात? जॉर्जिया एंड्रियानीनं स्वत: केला खुलासा

इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत अनुरागनं डिप्रेशनला झुंज दिल्याचे सांगितले. लॉकडाऊनमुळे, जेव्हा त्याच्या ‘अल्मोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत’ या चित्रपटाचे शूटिंग लांबले होते आणि त्याची वेब सीरिज ‘तांडव’ देखील अडचणीत आली होती, तेव्हा तो त्याच्या आयुष्यातील डार्क टाईममधून जात होता. अनुरागनं सांगितलं की, या घटनेनंतर त्यानं स्वत:ला एका शेलमध्ये ठेवलं. पुढे तो तीन वेळा रिहैबमध्ये गेला होता. याच दरम्यान त्याची प्रकृतीही बिघडली होती आणि त्याला हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला होता, असे अनुराग म्हणाला.

याविषयी सांगताना अनुराग पुढे म्हणाला, ‘या सर्व गोष्टींना कसं सामोरं जायचं हे त्याला समजत नव्हतं. हळू हळू मी स्वतःला सगळ्यापासून मागे खेचू लागलो. मी आता ठीक आहे. मी अजूनही चित्रपट करत आहे. मी त्यांनतर दोबारा हा चित्रपट बनवला. इतर लोकांप्रमाणे माझ्याकडे बसून वाट पाहण्याची लक्झरी नाही. (anurag kashyap reveals he was in depression went to rehab know the details) 

धमक्या मिळाल्यानं मुलगी त्रासली होती

अनुराग कश्यपच्या मुलीलाही (Aaliyah Kashyap) ट्विटरवर खूप ट्रोल करण्यात आले आहे, तिची मुलगी आलिया कश्यपलाही बलात्काराच्या धमक्या आल्या होत्या, त्यानंतर अनुरागच्या मुलीला अॅन्झायटी अटॅक येऊ लागले होते. याबाबत बोलताना अनुराग म्हणाला, ‘माझ्या मुलीला ट्रोल करण्यात आले होते, बलात्काराच्या धमक्या मिळत असल्यानं मी ट्विटर सोडलं होतं. त्याला अॅन्झायटी अटॅक येऊ लागले, म्हणूनच मी ट्विटरपासून दूर गेलो आणि पोर्तुगालला गेलो. त्यानंतर अनुरागनं लंडनमध्ये त्याच्या ‘अल्मोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत’ या चित्रपटाचे शूटिंग केले. दरम्यान, अनुरागनं सांगितलं की, या काळात आणि चित्रपट बनवताना त्यानं मुलीला वेळ दिला. तिच्यासोबत अनेक गोष्टी एक्सप्लोअर केल्या. Source link

Leave a Reply