Headlines

आनंद महिंद्रांचा नितीन गडकरींना सल्ला; दशकातून एकदा घडणारा तंत्रज्ञानाचा अविष्कार ते साकारु शकणार का?

[ad_1]

मुंबई : महिंद्रा ग्रुपचे (Mahindra Group)चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra)सोशल मीडियावर खूप ऍक्टिव आहेत. कायमच ते अनोख्या गोष्टी ट्विट करत असतात. यावेळी त्यांनी एक ट्विट केलंय. ज्या ट्विटमधून त्यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना सल्ला दिला आहे.

आनंद महिंद्रा यांनी केंद्रीय मंत्र्यांना हे ट्विट टॅग देखील केलं आहे. आनंद महिंद्रा यांनी टॅग केलेला व्हिडीओ आहे खास आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. दक्षिण कोरियामध्ये ट्रॅफिक सिस्टम या व्हिडीओत दाखवण्यात आली आहे.

हायवेवर दोन्ही बाजूंनी गाड्या जाण्यासाठी रस्ता आहे. मात्र रस्त्याच्या मधोमध एक सोलर पॅनलने एक सायकल ट्रॅक झाकला गेला आहे.

या सायकल ट्रॅकचे दोन फायदे आहेत. एक तर सायकल सावलीमध्ये चालवता येईल आणि ट्रॅफिकपासून त्यांची सुटका होईल. तसेच सोलार पॅनल असल्यामुळे सौर ऊर्जेच्या माध्यमातून इंधन देखील तयार होत आहे.

व्हा! काय आयडिया आहे.

व्हिडीओ शेअर करत आनंद महिंद्रा यांनी नितीन गडकरी यांना टॅग केला आहे. व्हा! काय आयडिया आहे? आपण देखील असाच विचार करायला हवा. हे बघण्यासारखं आहे.

सायकल चालवणाऱ्यांनी देखील एक्सप्रेसवेचा वापर टाळावा. आणि यामुळे सायकल स्वारांमध्ये देखील वाढ होईल.

नुकतीच ही आयडिया केली होती शेअर आनंद महिंद्रा यांनी नुकताच हातगाडीचा फोटोही शेअर केला आहे. या कार्टवरमोठ्या अक्षरात लिहिले आहे, ‘ओबेरॉय हॉटेल.’ या चित्राच्या मध्यभागी ‘चहा कॉफी’ असे लिहिले आहे.

त्याच्या तळाशी लिहिले आहे, आमची दिल्लीत कोणतीही शाखा नाही.’ हे शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी लिहिले की, ‘मोठे स्वप्न पाहा… 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *