अमित शाह यांच्या एक फोननं या राज्यातील सत्तेचं समीकरण बदलणार?


नवी दिल्ली : सध्या निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. त्यामुळे भाजप विरुद्ध काँग्रेस आणि स्थानिक पक्षांची तिसरी आघाडी अशी चुरस पाहायला मिळणार आहे. भाजप पूर्ण ताकदीनं जिंकण्यासाठी वेगवेगळे मास्टरप्लॅन तयार करत आहे. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक फोन केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या एका फोनमुळे एका राज्यातील सत्तेचं समीकरण बदलण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या राज्यात लवकरच राजकीय भूकंप येऊ शकतो अशी चिन्हं आहेत. सध्या तमिळनाडूमध्ये राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यामुळे केव्हाही सत्तेची बाजी पलटण्याची शक्यता आहे. 

राजकारण तापलेलं असताना आणि निवडणुकांच्या रणधुमाळीत अमित शाह यांनी द्रमुक आमदार कनीमोझी यांना फोन केल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या चर्चांना मोठं उधाण आलं आहे. एक महिन्यापूर्वी अमित शाह यांनी हा फोन केला होता. 
 
वाढदिवसाच्या शुभेच्छा की आणखी काही कारण? 

एका रिपोर्टनुसार अमित शाह यांनी 5 जानेवारी रोजी एम कनीमोझी यांना फोन केला होता. यावेळी त्यांनी कनीमोझी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे कनीमोझी यांच्या पक्षाचा एक नेता विशेष विधेयकावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची वेळ मागत आहे. मात्र त्यांना वेळ मिळत नाही. याच वेळी दुसरीकडे अमित शाह यांनी कनीमोझी यांना स्वत: फोन केला. 

मुख्यमंत्र्यांची उडाली झोप 

अमित शाह आणि कनीमोझी यांच्यात झालेल्या फोनमुळे कनीमोझी यांचे सावत्र भाऊ एमके स्टालिन यांची झोप उडाली.  या फोननंतर द्रमुक नेत्यांना धडकी भरली असून हा फोन जन्मदिवसाचं निमित्त नसून आणखी काही असल्याची शंका आहे. त्यामुळे नेमकं आता तमिळनाडूत पुढे काय होणार याची प्रतिक्षा सर्वांनाच लागली आहे. 

NEET वरून वाद

नीटच्या विधेयकावरून तमिळनाडूमध्ये राजकारण तापलं आहे. राज्यपाल आर एन रवि  आणि स्टालिन सरकार यांच्यामधील वादाचा विषय ठरला आहे. NEET चं विधेयक विधानसभेत एकमतानं मजूर झालं. मात्र राज्यपालांनी ते राष्ट्रपतींपर्यंत न पोहोचवल्याने वाद वाढला. आता त्याच दरम्यान द्रमुकच्या नेत्याला अमित शाह यांनी स्वत: फोन केल्यानं राजकीय भूकंप येऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.Source link

Leave a Reply