Allu Arjun सोबत काम करण्यासाठी Anushka Sharma चा नकार, कारण…


मुंबई : शाहरुख खानसोबत ‘रब ने बना दी जोडी’मधून पदार्पण करणारी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव बनली आहे.

मोठ्या ब्रेकनंतर अनुष्का पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे. पुनरागमनामुळे, अनुष्काशी संबंधित अनेक किस्से सध्या चर्चेत आहेत.

सध्या पुष्पाची भूमिका साकारणारा अभिनेता अल्लू अर्जुन चांगलाच चर्चेत आहे, बॉलीवूडपासून साऊथपर्यंतची प्रत्येक सुंदरी अल्लूसोबत काम करण्यास उत्सुक आहे, पण क्रिकेटर विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा अल्लू अर्जुनसोबत काम करण्यास उत्सुक नाही. तिने अल्लू अर्जुनसोबत काम करण्यास नकार दिला.

अल्लूच नाही, तर अनुष्का शर्माने अनेक साऊथ सुपरस्टार्ससोबत काम करण्यास नकार दिला आहे. 

अल्लू अर्जुनसोबतचअनुष्काने साऊथचे सुपरस्टार महेश बाबू आणि ज्युनियर एनटीआरसोबत काम करण्यास नकार दिल्याचं समोर आलं आहे.

अनुष्का शर्माने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. पण जेव्हा साऊथचे दिग्दर्शक तिच्याकडे या मेगास्टार्सचे चित्रपट घेऊन पोहोचले तेव्हा अभिनेत्रीने या कारणांमुळे चित्रपटात काम करण्यास नकार दिला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनुष्का शर्माने अल्लू अर्जुनसोबत हरीश शंकर आणि महेश बाबूच्या आडूमध्ये काम करण्यास नकार दिला होता. तसेच, तारखा आणि फी नसल्यामुळे, अभिनेत्रीने ज्युनियर एनटीआरच्या चित्रपटाला देखील लाल झेंडा दाखवला होता.Source link

Leave a Reply