आलियानं कमाल केलिया; वयाच्या 28 व्या वर्षी इतक्या संपत्तीची मालकीण


मुंबई : बबली गर्ल अशी ओळख असणारी, अतिशय कमी वयात बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री  आलिया भट्ट (Alia Bhatt) ही सध्या एका दमदार भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. संजय लीला भन्साळी यांच्या गंगुबाई काठियावाड़ी (Gangubai Kathiawadi) या चित्रपटातून ती सर्वांचीच शाबासकी मिळत आहे. 

फक्त अभिनयच नव्हे तर कपड्यांच्या ब्रँडपासून ते अगदी निर्मितीपर्यंतही आलिया तिची कारकिर्द विस्तारू पाहत आहे. 

मेहनत आणि चिकाटीच्या बळावर तिनं आतापर्यंत कोट्यवधींची संपत्ती जमवली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आलिया तब्बल 165 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. 

मुंबईतील वांद्रे येथे असणाऱ्या तिच्या घराचाही हक्क तिच्याकडे आहे. या घराची किंमत 32 कोटी इतकी आहे. आलियाकडे तिची स्वत:ची व्हॅनिटी आहे. 

फक्त मुंबईत नव्हे, तर सातासमुद्रापार म्हणजेच लंडनमधील एका उच्चभ्रू ठिकाणीही तिचं घर आहे. 

आलियाची सवय पाहता जमीन, घरांमध्ये पैसे गुंतवण्यावर तिचा जास्त भर दिसतो. काही दिवसांपूर्वीच तिनं जुहू येथेही एक घर खरेदी केलं. 

रणबीर कपूर याच्या इमारतीतही तिनं घर घेतलं. बॉलिवूडमध्ये सध्याच्या घडीला सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये आलियाचं नाव येतं. 

चित्रपटांसोबतच ती काही ब्रँडसाठी जाहिरातीही करते. महागड्या कारची तिला विशेष आवड. तिच्याकडे 1.74 कोटी रुपये इतकी किंमत असणारी रेंज रोव्हर गाडी आहे. 

इतकंच नाही, तर तिच्याकडे ऑडी ए6 ही कारही आहे. या कारची किंमत 61 लाख रुपये इतकी आहे. बीएमडब्ल्यू 7 सीरिजमधील कारही तिच्याकडे आहे. या कारची किंमत 1.37 कोटी रुपये इतकी आहे. 

आलियाची ही श्रीमंती पाहता, खरंच म्हणावं लागेल आलियानं कमाल केलिया… Source link

Leave a Reply