Alia चा पायगुणच म्हणा, अखेर Ranbir च्या ईडापिडांवर Brahmastra


Ranbir Kapoor Alia bhatt : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी त्यांच्या रिलेशनशिपला एक वेगळी ओळख देत लग्न करण्याचा निर्णय घेतला. आलिया रणबीरच्या आयुष्यात आली आणि तिनं त्याला पावलोपावली साथ दिली. लग्नबंधनात अडकण्यापूर्वीपासूनच ती त्याच्या जीवनातील प्रत्येक क्षणात साथ देताना दिसली. वडिलांच्या निधनानंतर तिनं रणबीरला आधार दिला. चित्रपटांमध्ये अपयश मिळालं, तेव्हाही तिनं त्याला धीर दिला. अशा या रणबीरसाठी आता आलियाचा पायगुण खुप काही घेऊन आला आहे. (Brahmastra Movie review)

चित्रपटांमध्ये वारंवार मिळणारं अपयश आणि त्यामागोमागच रणबीरच्या Brahmastra या चित्रपटावर होणारी बंदीची मागणी पाहता त्याचं करिअर आता धोक्यात आलंय कीय काय? असाच प्रश्न चाहत्यांना सतावू लागला. पण, इथं आलियासोबतचा त्याचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट प्रदर्शित झाला आणि जणू रणबीरच्या ईडापिडांवरच ब्रह्मास्त्रानं घाला घातला. 

9 सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं पहिल्या तीन दिवसांमध्येच 112.20 कोटी रुपयांची कमाई केली. भारतात या चित्रपटानं 124.49 रुपये तर, जागतिक स्तरावर तब्बल 226.75 कोटी रुपये कमवले. इतके वाद, समाजातील काही वर्गांचा रोष हे सर्व अडथळे असतानाही हा चित्रपट कमाईच्या बाबतीत मात्र सुस्साट निघाला. (Brahmastra Movie review in marathi)

 

नॉन हॉलिडे ओपनिंग वीकेंड’ असूनही आलिया- रणबीर स्टारर ‘ब्रह्मास्त्र’ला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. पहिल्याच वीकेंडला धडाकेबाज कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत या चित्रपटानं पहिल्या 10 मध्ये स्थान मिळवलं आहे. (Ranbir Kapoor Alia bhatt starrer Brahmastra movie collection )

दक्षिणेतही बॉलिवूडचा डंका (South india)
दक्षिण भारतातही या बॉलिवूडपटानं धुरळा उडवला आहे. सुरुवातीच्या दिवसांमध्ये या चित्रपटानं 34.70 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. कर्नाटकात 8.5 कोटी रुपये, आंध्र प्रदेश/ तेलंगणा 19.2 कोटी रुपये, तामिळनाडू 5.3 कोटी रुपये आणि केरळमध्ये या चित्रपटानं 1.65 कोटी रुपये इतकी कमाई केली आहे. 

लग्नानंतर पहिल्यांदाच आलिया आणि रणबीर या चित्रपटातून एकत्र झळकले. ज्यामुळं त्यांच्या रिअल लाईफ केमिस्ट्रीसोबतच चाहत्यांनी त्यांच्या रील लाईफ केमिस्ट्रीलाही तितकीच पसंती दिली आहे. निमित्त काही असो, कपूर कुटुंबातील या पठ्ठ्याच्या करिअरला आधार मिळाला असं म्हणायला हरकत नाही. Source link

Leave a Reply