Headlines

Alia Bhatt Ranbir Kapoor : पाहा VIDEO, परस्त्रीशी रणबीरची जवळीक पाहून आलियाचे हावभाव क्षणात बदलले

[ad_1]

Alia Bhatt Ranbir Kapoor Video Video : तुमच्या पतीनं किंवा प्रियकरानं एखाद्या परस्त्रीला किंवा एखाद्या महिलेला अतिशय प्रेमानं मिठी मारली, मैत्रीच्या नात्यानं हात मिळवला तर तुम्हाला कसं वाटेल? प्रत्येक व्यक्तीनुसार या प्रश्नाचं उत्तर मिळेल. काही महिलांना हे सर्व अगदी Normal आहे असं वाटेल. काहीजणींची मात्र यावर हरकत असेल. म्हणजे आपण समोर असताना हा माणूस परस्त्रीशी असा वागतोच कसा, हा खडा सवाल करत काहीजणी पतीला हैराणही करतील. अभिनेत्रीही काहीशा अशाच आहेत माहितीये? (Bollywood) बॉलिवूडमधील New Mommy आलिया भट्टचा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून हेच लक्षात येत आहे (Alia bhatt Viral video). 

अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर आलिया भट्टनं अभिनेता (Rabir Kapoor Alia bhatt wedding) रणबीर कपूर याच्याशी लग्नगाठ बांधली. अतिशय छोटेखानी, पण तितक्या सुरेख अशा सोहळ्यामध्ये या दोघांनी साता जन्माची साथ देण्याची वचनं एकमेकांना दिली. पण, पावलोपावली साथ देईन म्हणणारा हाच पती, रणबीर आलियासमोर चुकला आणि तिचा राग सर्वांनीच पाहिला. 

(Alia bhatt Ranbir kapoor daughter ) लेकिच्या जन्मानंतर आता कुठे आलिया बऱ्याच कार्यक्रमांना पुन्हा एकदा हजेरी लावताना दिसत आहे. ती पुन्हा एकदा जुन्या Routine मध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे. पण, यामध्ये तिचं रणबीरवरही चौकस लक्ष आहे बरं (Ranbir kapoor Video). 

सोशल मीडियावर व्हायरल होतोय ‘तो’ व्हिडीओ

हल्लीच आलिया रणबीरच्या मालकीच्या (Football) फुटबॉल टीमच्या सामन्यासाठी गेली होती. लेकिच्या जन्मानंतर अशा एखाद्या सामन्यासाठी ही जोडी पहिल्यांदाज एकत्र आली होती. या क्षणाचे असंख्य व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर समोर आले. यातील एका व्हिडीओमध्ये दिसत असल्यानुसार रणबीरनं एक सीट सोडून बसलेल्या एका मुलीशी हात मिळवला, तिला ओळख दिली. आलियासोबतही त्यानं तिची ओळख करून दिली. 

आलिया मात्र यावेळी चांगलीच तोऱ्यात दिसली. जिथं रणबीरनं या मुलीला हात मिळवला तिथं आलियाच्या चेहऱ्यावर फक्त हास्याची एक रेष उमटली. तिची नजर समोरच होती. पुढे रणबीर तिला बसण्यासाठी आलियाच्या बाजुची सीट दाखवत असताना ती मात्र मनात नेमका किती राग सांभाळून होती हेच कळेना. 

आलियाचे हे बदललेले हावभाव आणि तिनं रणबीरचा घटट् धरून ठेवलेला हात पाहता, नेटकऱ्यांनी या अभिनेत्रीच्या स्वभावाकडे लक्ष वेधलं. किती गर्विष्ट आहे ही…, बापरे! आलिया असंही वागू शकते असं म्हणत अनेकजण या व्हिडीओवर React झाले. तुम्ही हा व्हिडीओ पाहून काय म्हणाल? 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *