‘अक्षयपासून दूर राहा’, दुप्पट वयाच्या रेखा यांच्या कृती पाहून रवीना टंडनचा संताप अनावर


मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) आणि अक्षय कुमारचं (Akshay Kumar) रिलेशनशिप हे सलमान खान आणि ऐश्वर्या राय प्रमाणेच बॉलिवूडमधील सर्वात गाजलेल्या लव्ह स्टोरींपैकी एक आहे. 1994 साली प्रदर्शित झालेल्या सुपरहिट अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘मोहरा’च्या शूटिंगदरम्यान त्यांचे हे अफेअर सुरू झाले. त्या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. परंतु काही काळानंतर नंतर, रवीना आणि अक्षयचे अफेअर खडतर टप्प्यातून गेले जेव्हा अक्षयचं नाव  हे रेखा यांच्यासोबत जोडण्यात आलं. त्या प्रतिक्रियेवर रवीनानं रेखा (Rekha) यांना अक्षयपासून दूर राहण्यास सांगत खडसावले होते. 

रिपोर्टनुसार, 1996 मध्ये आलेल्या ‘खिलाडियों का खिलाडी’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय आणि रेखाची जवळीक वाढू लागली आणि लवकरच, अक्षय आणि रेखाचा रोमान्सच्या चर्चा  इंडस्ट्रीत पसरू लागल्या, ज्यामुळे रवीनाला खूप असुरक्षित वाटू लागले.

आणखी वाचा : लेकाच्या ‘त्या’ कृतीवर काजोल म्हणते, ‘चुका होतात पण…’

रवीनाच्या म्हणण्यानुसार, अक्षय रवीनासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे माहित असूनही रेखा अक्षयसोबत जवळ येण्याचा प्रयत्न करत होत्या. Rediff.com ला दिलेल्या जुन्या मुलाखतीत रवीना म्हणाली, ‘मला वाटत नाही की अक्षयचा रेखा यांच्याशी काही संबंध असेल. खरं तर, तो त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. अक्षयनं रेखा यांना चित्रपटामुळे सहन केलं. एका वेळेनंतर रेखा यांनी अक्षयसाठी घरातून जेवणाचा डब्बा आणायला सुरुवात केली होती. त्यावेळी मी हस्तक्षेप केला कारण या गोष्टी मर्यादेचा पलीकडे जात असल्याचे मला दिसले.’ 

आणखी वाचा : ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीनं पळून जाऊन दिग्दर्शकाशी केलं लग्न!

सिने ब्लिट्झला दिलेल्या दुसर्‍या एका मुलाखतीत रवीना म्हणाली की ‘ती रेखा यांना त्यांच्या हद्द देखील दाखवून देईल. जर या अभिनेत्रीला माहित असेल की आम्ही एकत्र आहोत आणि तरीही अक्षयच्या जवळ यायचा विचार करत असेल, तर मी त्यांना माझा हाताचे माझे पंजे दाखवीन. पण माझ्या अंदाजानुसार अक्षयला परिस्थिती कशी हाताळायची हे माहित आहे.’

आणखी वाचा : दोन्ही किडनी निकामी, उपचारासाठीही पैसे नाहीत; अभिनेत्रीची प्रकृती चिंताजनक

शेवटी, अक्षय आणि रेखा कधीच रिलेशनशिपमध्ये आले नाहीत. मात्र, त्यानंतर अक्षयची दुसरी अभिनेत्री शिल्पा शेट्टीशी असलेली जवळीक रवीनाला खूप चिंता वाटू लागली होती. असं म्हटलं जातं की अक्षयनं नंतर शिल्पा शेट्टीसाठी (Shilpa Shetty) रवीनाची फसवणूक केली आणि शेवटी काही काळ डेट केल्यानंतर ते नातं देखील तोडलं. अक्षय पुन्हा शिल्पासोबत विभक्त झाला आणि नंतर ट्विंकल खन्नासोबत (Twinkle Khanna) लग्न केलं.Source link

Leave a Reply