घटस्फोटानंतर अखेर समंथाचं पुढचं पाऊल, आयुष्यात परतलं प्रेम


Samantha ruth prabhu naga Chaitanya : जवळपास 4 वर्षांचं वैवाहिक नातं तोडत अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य या दोघांनीही आपल्या वाटा वेगळ्या केल्या. प्रेमाच्या आणाभाका घेत त्याच बळावर उभा असणारा नात्याचा डोलारा त्यांच्या एका निर्णयानं कोलमडला. घटस्फोट घेणं अर्थातच दोघांसाठीही सोपं नव्हतं.

समंथाला समाजाकडून यादरम्यान अवहेलनाही झेलावी लागली. पण, तरीही तिनं धीर सोडला नाही. आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करत समंथा पुढे जात राहिली आणि आता पुन्हा एकदा ती पुढचं पाऊल टाकताना दिसत आहे.

असं म्हटलं जात होतं की पहिल्या अपयशी लग्नानंतर आता समंथा पुन्हा या नात्याकडे वळणार नाही. पण, तिच्या चाहत्यांसाठी आता गोड बातमी आहे. कारण लग्न तुटलं असलं तरीही तिचा प्रेमाला विरोध नाही.

सध्याच्या घडीला समंथा अतिशय आनंदात असून सकारात्मक विचारांकडे तिचा जास्त कल दिसून येत आहे. ती सध्या आयुष्याला योग्य वळण देण्यासाठी उर्जा एकवटत आहे.

यापुढे कोणीही हक्काची आणि प्रेमाची व्यक्ती शोधण्यात यश मिळालं, तर नक्कीच मी त्याचं स्वागत करेन असं समंथा नुकतीच एका मुलाखतीदरम्यान म्हणाली.

जीवनाच्या या टप्प्यावरही समंथाचा सकारात्मक दृष्टीकोन पाहता आघात कितीही मोठा असो, त्यातून सावरण्याती ताकद उराशी बाळगता आली पहिजे हेच सिद्ध होत आहे. शिवाय आता समंथानं तयारी तर दाखवलीये, तेव्हा तिच्या आयुष्यात प्रेम म्हणून नेमकी कोणाची एंट्री होते हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.Source link

Leave a Reply