“…तर पुढे काय होणार हे महाराष्ट्राने पाहावं,” पत्रकार परिषदेतील ‘त्या’ घटनेनंतर अजित पवार यांची शिंदे-फडणवीसांवर टीका | ajit pawar criticizes devendra fadnavis and eknath shinde over mike snatching in press conferenceराज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) राज्याचा कारभार हाकत आहेत. शिंदे यांनी दोन दिवसीय विशेष अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर त्यांच्या सरकारवर खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब झाले. हे अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या समोरचे माईक खेचत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिले होते. फडणवीसांच्या या कृतीनंतर राज्यात वेगवेगळ्या प्रतिक्रया उमटल्या. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीदेखील फडणवीस-शिंदे यांना लक्ष्य केले आहे. सुरुवातीलाच अशी ओढाओढ होत असेल, तर पुढे काय होणार? असा सवाल खोचक सवाल अजित पवार यांनी केला आहे.

हेही वाचा >>> इंधन दर कपातीवरून अजित पवारांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका; म्हणाले, “हा तर राज्य सरकारचा…”

“अडीच वर्षात तुम्ही असं कधी पाहिलं आहे का? महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यांचा तो मान आहेच. त्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून द्वितीय क्रमांकावर मी काम करायचो. परंतु मी असं कधीही माईक खेचून घेतले नाही. तुम्ही जे सांगतायत त्याचं उत्तर मी देतो, असं सांगता आलं असतं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीच तो माईक दिला असता. माईक स्वत: खेचायचं कारण नव्हतं,” असा खोचक सल्ला अजित पवार यांनी फडणवीस यांना दिला.

हेही वाचा >>> “दोघेच अख्ख्या महाराष्ट्राचे मालक, १६५ आमदारांचं पाठबळ तरी…” मंत्रीमंडळ विस्तारावरुन अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना टोला

तसेच, “सरकार चावलत असताना पक्षाच्या संदर्भात विचार करायचा नसतो. शिवसेना अ गट म्हणायचं की ब गट म्हणायचं ते देवालाच माहिती. अलीकडे माध्यमांचे कॅमेरे बारकाईने नजर ठेवून असतात. त्यामुळे त्यांच्या नजरेतून काहीही झाकून राहत नाही. आतातरी ही सुरुवात आहे. मंत्रीमंडळ अस्तित्वात न येता सुरुवातीलाच अशी ओढाओढ असेल आणि चिठ्ठ्या देणं सुरु झालं असेल, तर पुढे काय होणार हे महाराष्ट्राने पाहावं,” असे म्हणत अजित पवार यांनी शिंदे गट-भाजपा सरकारच्या अस्तित्वाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले.Source link

Leave a Reply