Headlines

Ajit pawar alligation that shinde government stop working of sambhaji maharaj statue in wadhu tulapur spb 94

[ad_1]

राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. शिंदे सरकारकडून वढू-तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक विकासासाठी मंजूर झालेल्या निधीला या सरकारने स्थगिती दिली, असा आरोप अजित पवार यांनी केला.

हेही वाचा – मंत्रीमंडळ विस्तारावरून अजित पवारांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका; म्हणाले, “राज्यात बहुमताचे सरकार…”

छत्रपती संभाजी महाराजांकडे एक शौर्य गाजवणारा राजा म्हणून आपण बघतो. महाविकास आघाडी सरकारने वढू-तुळापूर येथे त्यांचे स्मारक बनवण्याचे ठरवले होते. या स्मारकासाठी महाविकास आघाडी सरकारने निधीही मंजूर केला होता. त्याचा २६५ कोटींचा आराखडादेखील तयार झाला होता. मात्र, हा निधी राज्य सरकारकडून रद्द करण्यात आला आहे. तसेच शाहू महाराजांच्या स्मारकासाठीही निधी दिला होता, तो देखील रद्द करण्यात आला आहे.

हेही वाचा – “खासदारांच्या घरावर मोर्चा काढायचा अधिकार तुम्हाला…”, शिंदे गटाचा शिवसैनिकांना संतप्त सवाल

शिंदे फडणवीस सरकारकडून महाविकास आघाडी सरकारच्या काळातली अनेक मंजूर विकासकामे स्तगित करण्याचे काम सुरु आहे. ही कामे काही आमदारांच्या घरातली नव्हती. ही विकासाची कामे होती, इतकं खालच्या पातळीचे राजकारण महाराष्ट्रात कधीही झाले नव्हते, असे अजित पवार म्हणाले.

हेही वाचा – कोल्हापुरात शिवसैनिकांचा बंडखोर खासदार धैर्यशील मानेंच्या घरावर मोर्चा; तर धैर्यशील माने म्हणाले…

दरम्यान, तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात वढू-तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक विकासासाठी निधी मंजूर करून करण्यात आला होता. त्यासाठीचा २६५ कोटी रुपयांचा आरखडाही तयार करण्यात आला होता.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *