आई ही मोठी जबाबदारी आहे, तुम्ही मुलांशी असं वागू शकत नाही… पाहा नेमकं काय घडलं


फरिदाबाद : आई आणि मुलांचं नातं हे जगातील असं नातं आहे. ज्याची तुलना कशासोबतही होऊ शकत नाही. आई आपल्या मुलाला नऊ महिने आपल्या पोटात वाढवते, ज्यामुळे आपल्या मुलाला आई स्वत:चाच एक भाग म्हणून वाढवतं. आपल्या बाळाला काहीही कमी पडायला नको असा तिचा अट्टाहास नेहमी असतो, ती आपल्या मुलासाठी स्वत:च्या तोंडचा घास काढून द्यायाल देखील मागे पुढे पाहात नाही. ती आपल्या बाळाला प्रेमाने वाढवते. आपल्या बाळाल काहीही झालं तरी आईच्या डोळ्यात चटकन पाणी येतं. बाळाला संभाळणं ही आईची जबाबदारी असते, त्यामुळे आई आपल्या बाळाशी कधीही चुकीचं वागत नाही.

परंतु सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यावर तुमच्या काळजाचा ठोका चुकेल, यामध्ये या आईने असं काही केलं आहे, जे करण्याचा विचार कोणतीही आई स्वप्नात सुद्धा विचार करणार नाही.

हा व्हिडीओ दाखवण्यासारखा तर नाही, परंतु कोणत्याही आईने आपल्या मुलासोबत अशी चुक करायला नको याची जाणीव करुन देण्यासाठी आम्ही तुम्हाला हा व्हिडीओ दाखवत आहोत.

या व्हिडीओमध्ये एका आईने आपल्या मुलाला उंच इमारतीच्या 10 व्या मजल्यावरुन लटकवतं ठेवलं होतं, जे फारच चुकीचं आणि जीव  घेणं आहे. या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

ही घटना फरीदाबादच्या सेक्टर-82 स्थित फ्लोरिडा सोसायटीमधील आहे. त्यानंतर जेव्हा काही लोकं या व्हिडीओच्या शोधात त्या ठिकाणी पोहोचले आणि त्या आईची चौकशी केली, तेव्हा एक धक्कादायक माहिती त्या आईने दिली.

मीडिया रिपोर्टनुसार ही महिला फ्लोरिडा सोसयटीच्या  10 व्या मजल्यावरती राहाते, तिचे कपडे खालच्या मजल्यावर, म्हणजेच इमारतीच्या नवव्या मजल्यावर पडले होते, परंतु खालच्या मजल्यावरील घरात कोणीही राहात नसल्यामुळे तिला तिचे कपडे पुन्हा मिळाले नाही, ज्यानंतर या महिलेनं आपले कपडे मिळवण्यासाठी आपल्या साडिच्या साहाय्याने  मुलाला खालच्या मजल्यावरती कपडे घ्यायला पाठवले आणि नंतर आपल्या मुलाला साडीच्या सहाय्याने वरती खेचले.

नशीबाने कोणतंही दुर्दैवी कृत्य त्या मुलासोबत घडलं नाही. परंतु त्या आईचं हे वागणं कितपतं योग्य आहे?

मुलांवर कितीही रागवलं, काहीही झालं तरी अशा प्रकारे आपल्या मुलांच्या आयुष्याशी खेळणं फारच चुकीचं आहे. त्यामुळे कोणत्याही आईने असं वागू नये आणि आपल्या मुलांच्या आयुष्याचा असा खेळ करु नये.Source link

Leave a Reply