घटस्फोटानंतर समंथा खास व्यक्तीच्या मिठीत, म्हणाली, ही व्यक्ती माझ्या खूप जवळ…


मुंबई : साऊथ स्टार समंथा रुथ प्रभू आजकाल सतत चर्चेत आहे. पुष्पा चित्रपटातील ‘ओ अंतवा’ या आयटम साँगमध्ये समंथाने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.याशिवाय अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते.

समंथाने जेव्हापासून पती नागा चैतन्यपासून वेगळे होण्याची घोषणा केली तेव्हापासून अभिनेत्रीच्या प्रत्येक हालचालींबाबत चर्चा होताना पाहायला मिळत आहेत. समंथाच्या प्रत्येक सोशल मीडिया पोस्टवर चाहते लक्ष ठेवून आहेत आणि अभिनेत्रीच्या पोस्ट देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

नागा चैतन्यपासून विभक्त झाल्यानंतर, समंथा सध्या खूप प्रवास करत आहे. विविध ठिकाणांना ती भेट देत आहे. तिच्या चाहत्यांसोबत हे खास क्षण ते शेअर करत आहे. दरम्यान, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर एका खास व्यक्तीसोबतचा फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. 

ही आपल्या आयुष्यातील खास व्यक्ती असल्याचं तिने सांगितलं आहे. या व्यक्तीसोबतचा एक फोटो तिने पोस्ट केला आहे. साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा ही समंथासाठी खूप स्पेशल आहे.

समंथाने नयनतारासोबत एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये दोन्ही मैत्रिणी खूप आनंदी दिसत आहेत. फोटोमध्ये नयनतारा समंथाला मिठी मारत आहे आणि दोघांही आनंदाने पुढे चालताना दिसत आहेत. अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘#नयनतारा माझ्या खास मैत्रीसाठी. तिचं सोशल मीडियावर अकाऊंट नाही, तिने तुम्हाला प्रेम पाठवलं आहे.

 समंथा रुथ प्रभूला तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला आहे, पण तिच्या कामामुळे तिच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस भर पडत आहे.

अलीकडेच, पुष्पा चित्रपटातील आयटम साँग केल्यानंतर, ती आता तिच्या पुढील चित्रपटासाठी चर्चा करत आहे, ज्याचे नाव आहे शकुंतलम असं आहे. समंथाने तिचा फर्स्ट लूकही रिवीलकेला आहे.Source link

Leave a Reply