घटस्फोटानंतर रजनीकांत यांच्या मुलीने पहिल्या पतीला दिलं उत्तर….


मुंबई : अभिनेता धनुष यानं त्याची पत्नी, ऐश्वर्या रजनीकांत हिच्यासोबतचं आपलं वैवाहिक नातं संपुष्टात आल्याटी माहिती जाहीर केली. एका पत्रकाच्या माध्यमातून धनुष आणि ऐश्वर्या या दोघांनीही आपण 18 वर्षांचा संसार मोडत असल्याचं सांगितलं. 18 वर्षांच्या सहवासानंतर, पालक म्हणून एकत्र आयुष्य जगल्यानंतर आता वाटा वेगळ्या झाल्याचं त्यांनी आपआपल्या पोस्टमधून म्हटलं. 

अतिशय अनपेक्षितपणे या जोडप्याने विभक्त होण्याचा त्यांचा निर्णय सांगितला. ज्यानंतर अनेकांनाच हादरा बसला. घटस्फोटानंतर आता ऐश्वर्या रजनीकांतने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळ ऐश्वर्या आणि धनुष दोघे चर्चेत आले आहेत.

नुकताचं ऐश्वर्याचं ‘पयानी’ गाणं प्रदर्शित झालं आहे. ज्यामुळे धनुषने पहिल्या पत्नीला शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विट करत धनुष म्हणाला, ‘पयानी गाण्यासाठी तुला शुभेच्छा….’ शुभेच्छा देताना त्याने ऐश्वर्याला दोस्त म्हणून संबोधलं आहे.

यावर ऐश्वर्याने ट्विटचं उत्तर देत, धनुषचे आभार मानले आहेत… सध्या ऐश्वर्याचं ट्विट सर्वत्र व्हायरल होत आहे. जेव्हा ऐश्वर्या आणि धनुषच्या विभक्त झाल्याची माहिती चाहत्यांसमोर आली, तेव्हा त्यांनी आताच्या घडीला वेगळं होऊ स्वत:ला समजून घेण्याची वेळ आल्याचं या दोघांनीही सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं. 

ज्यामुळे खरंच त्यांच्या एकत्र येण्याची काही चिन्हं आहेत का, असाच प्रश्न चाहत्यांच्या मनात घर करत आहे. Source link

Leave a Reply