Headlines

राज ठाकरेंनंतर काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट? ‘वर्षा’वर राजकीय हालचालींना वेग | After raj thackeray varsha gaikwad milind devara and amin patel went to meet cm eknath shinde rmm 97

[ad_1]

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतंच मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर काँग्रेस पक्षाचे तीन बडे नेतेही ‘वर्षा’ बंगल्यावर दाखल झाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. संबंधित काँग्रेस नेत्यांमध्ये महाराष्ट्राच्या माजी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, काँग्रेस नेते मिलिंद देवरा आणि अमिन पटेल आदि नेत्यांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.

संबंधित काँग्रेस नेते नेमक्या कोणत्या कारणासाठी ‘वर्षा’ बंगल्यावर दाखल झाले आहेत? याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. पण मतदारसंघातील कामं आणि शाळेच्या पटसंख्येबाबत सुरू असलेल्या वादावर चर्चा करण्यासाठी ही भेट झाल्याची चर्चा आहे.

हेही वाचा- VIDEO: यूपीतील योगी सरकारच्या कारभारावर भाजपा खासदाराचं मोठं विधान, म्हणाले “तोंड उघडलं तर…”

विशेष म्हणजे, काही वेळापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वत: पुष्पगुच्छ देऊन राज ठाकरेंचं स्वागत केलं. यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंतही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी उपस्थित होते. संबंधित नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? याचा तपशीलही अद्याप समोर आला नाही. दरम्यान, राज ठाकरे ‘वर्षा’ बंगल्यावरून बाहेर पडत असताना, काँग्रेसचे तीन बडे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. ‘वर्षा’ बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग आल्याने चर्चांना उधाण आलं आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *