Headlines

अखेर ठरलं! Salman Khan या अभिनेत्रीसोबत अडकणार लग्नबंधनात? मित्राने केला मोठा खुलासा

[ad_1]

Salman Khan’s Friend On His Dating News With Actress Pooja Hegde : बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सलमान लवकरच ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, या सगळ्यात ते दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर ते दोघं लवकरच लग्न बंधनात अडकणार असेही म्हटले जात होते. आता त्यावर सलमानच्या जवळच्या मित्रानं सत्य सांगितलं आहे. 

पाहा काय म्हणाला सलमानचा मित्र –

ETimes च्या रिपोर्टनुसार, सलमानच्या एका जवळच्या मित्रानं त्याचे आणि पूजा हेगडे रिलेशनशिपमध्ये असल्याची बातमी नाकारली आहे. ते म्हणाले, ‘जे लोक अशा हास्यास्पद बातम्या पसरवतात, त्यांना थोडी लाज वाटली पाहिजे. ती मुलगी म्हणजेच पूजा सलमानच्या मुलीच्या वयाची आहे. दोघंही चित्रपटात एकत्र काम करत असल्यामुळे काही मुर्खांना वाटले की चित्रपटाचं प्रमोशन चांगलं आहे, पण ते लाजिरवाणं आहे.’ सलमान खानच्या मित्रानं पुढे सांगितलं की ‘भाईजानला अशा कोणत्याही अफवांनी फरक पडत नाही. त्यामुळे तो यावर रिअॅक्ट करत नाही.’

हेही वाचा : शस्त्रक्रिया केलेला शरीराचा 95 टक्के भाग काढला; Singer चा धक्कादायक खुलासा 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी उमेर संधू नावाच्या स्वयं घोषी चित्रपट समीश्रकानं या अफवेला दुजोरा दिला होता. सलमान खान आणि पूजा हेगडे हे नवीन हॉट कपल असल्याचं उमेर संधूनं ट्विट करत म्हटले आहे. त्यानं ट्विट करत म्हटले की, ‘ब्रेकिंग न्यूज: नवीन कपल!!! मेगा स्टार #SalmanKhan #PoojaHegde च्या प्रेमात आहे!! त्याच्या प्रोडक्शन हाऊसनं तिला पुढील 2 चित्रपटांसाठी साइन केले आहे!! ते दोघे आजकाल एकमेकांसोबत बराच वेळ व्यथित करताना दिसतात!! सलमानच्या जवळच्या सूत्रांनी या बातमीला दुजोरा दिल्याचे यावेळी म्हटले आहे. 

पूजा लवकरच रणवीर सिंहसोबत ‘सर्कस’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीनं केलं आहे. दरम्यान, ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात सलमान खानसोबत पूजा हेगडे आणि शहनाज गिल देखील दिसणार आहे. चित्रपटाच्या शूटिंग सुरु झाली आहे आणि या दरम्यानच सलमान आणि पूजाच्या रिलेशनशिपच्या अफवाह सुरु झाल्या. (salman khan s friend talked about rumors of his relationship with pooja hegde) 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *