Headlines

ह्यांना काय करायचंय? लग्नानंतर 10 वर्षांनी आई होण्याबाबत Ram Charan ची पत्नी संतापत असं का म्हणाली?

[ad_1]

Ram Charan’s Wife on Motherhood : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता राम चरण (Ram Charn) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या RRR चित्रपटामुळे चर्चेत आहे. राम चरण आणि त्याची पत्नी उपासना (Upasana Konidela) लवकरच आई-वडील होणार आहेत. लग्नाच्या 10 वर्षांनंतर त्यांच्या घरात पाळणा हलणार आहे. यापुर्वी ते दोघे कुटुंब सुरु करण्यासाठी वेळ काढण्याविषयी बोलले होते. काही काळापूर्वी अध्यात्मिक गुरु सद्गुरु यांच्याशी झालेल्या एका संभाषणात, उपासनाने लोकांनी तिला मातृत्व स्वीकारण्यास सांगण्याबद्दल सांगितले.

पाहा काय म्हणाली उपासना

या वर्षाच्या सुरुवातीला मंचावर सद्गुरूंसोबत झालेल्या संभाषणात उपासनानं त्यांना विचारले की लोक ‘तिच्या प्रजननक्षमतेवर प्रश्न विचारणे हे त्यांचे कर्तव्य का मानतात.’ तिने मंचावर विचारले की, ‘माझ्या लग्नाला 10 वर्षे झाली आहेत आणि मी त्यात खूप आनंदी आहे. माझे माझ्या आयुष्यावर, माझ्या कुटुंबावर प्रेम आहे, पण लोक माझ्या RRR वर प्रश्न करणे हे त्यांचे कर्तव्य का मानतात. पहिले माझे नाते आहे. दुसरी म्हणजे माझी प्रजनन करण्याची क्षमता आणि तिसरी म्हणजे माझ्या आयुष्यातील भूमिका. माझ्यासारख्या अनेक स्त्रिया आहेत ज्यांना उत्तर हवे आहे.’

यावर उत्तर देत सद्गुरुंनी उपासना आणि प्रत्येक स्त्री जी आई होऊ शकते, परंतु तिला आई होण्याची इच्छा नाही, पुरस्कार देऊ असे सांगितले होते. ‘मी आधीच त्या सर्व तरुणींसाठी बक्षीस जाहीर केले आहे जे निरोगी आहेत आणि प्रजनन करू शकतात परंतु त्यांची तसं करण्याची इच्छा नाही. ही सर्वात मोठी सेवा आहे जी तुम्ही सध्या करू शकता. जर तुम्ही वाघिणी असता, तर मी म्हटलं असतं की तुम्ही प्रजनन करायला हवे, कारण ती एक लुप्तप्रजाती आहे. पण ही लुप्तप्राय प्रजाती नाही. आपण खूप आहोत.’ यापुढे उपासना सद्गुरु यांची मस्करी करत म्हणाली, ‘तुम्हाला माझी आई आणि सासु या दोघींचा फोन येणार आहे.’

हेही वाचा : ‘मी त्यांच्यासारखी नाही आणि…’, Ex-Husband अरबाज खानच्या ब्रेकअपवर Malaika Arora चं मोठ वक्तव्य

दरम्यान, राम चरण आणि त्याची पत्नी उपासनाच्या प्रेग्नंसीची बातमी त्याचे वडील चिरंजीवी यांनी केली. चिरंजीवी यांनी त्यांच्या त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं की ‘श्री हनुमान जीच्या आशीर्वादानं, आम्हाला हे कळविण्यात आनंद होत आहे की उपासना आणि राम चरण हे लवकर पालक होणार आहेत. उपासना त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. सुरेखा आणि चिरंजीव कोनिडेला, शोभना आणि अनिल कामिनेनी खूप खूप प्रेम.’ असे कॅप्शन दिले आहे.

राम चरण आणि उपासना हे दोघं 2012 साली हैद्राबादमध्ये लग्न बंधनात अडकले आहेत. या दोघांची भेट ही एका स्पोर्ट्स क्लबमध्ये झाली होती आणि त्यानंतर त्यांच्या मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. 2022 हे वर्ष रामसाठी त्याच्या खासगी आणि करिअरमध्ये खूप खास आहे. SS राजामौली दिग्दर्शित RRR या वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झाल्यापासून जगभरात हिट ठरला आहे. त्याच वेळी, त्याच्या वैयक्तिक आयुष्यात देखील ते वडील बनणार आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *