आता तर हद्दंच झाली राव…. अंगावर फक्त कपडे चिकटवून उर्फी जावेदचा फोटो शुट, पाहा व्हिडीओ


मुंबई : जेव्हा जेव्हा बोल्डनेसचा विचार येतो तेव्हा उर्फी जावेदला मात देणे कठीण होते. कारण उर्फी कधी कोणते कपडे घालून समोर येईल याचा काहीही नेम नसतो. कपडेच काय तर उर्फी बऱ्याचदा गोणपाट आणि वायर्सचे कपडे घालताना देखील दिसली. त्यामुळे ती काहीही घालू शकते असा लोकांचा समज आहे आणि यासंदर्भात सोशल मीडियावर मीम्स देखील सुरु आहेत. आता पुन्हा एकदा उर्फीने लोकांना मीम मटेरीअल दिलं आहे आणि ती अशा कपड्यात समोर आली आहे, ज्यामुळे ती जोरदार ट्रोल देखील होऊ लागली आहे.

उर्फीचा सोशल मीडियावर असा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तिने कपडे घातले नाही तर चक्कं चिकटवले आहेत असंच म्हणावं लागेल.

आता असं बोलल्यानंतर तुमच्या मनात नक्की उत्सुक्ता वाढली असणार, यावेळेली उर्फी अशी कोणत्या नव्या रुपात पाहायला मिळणार? मग तुम्ही हा व्हिडीओ पाहा.

या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने फक्त हिरव्या रंगाचा स्कर्ट घातला आहे. विशेष बाब म्हणजे अभिनेत्रीने हा स्कर्ट तिच्या अंगावर दोरीने बंधला आहे. एवढेच नाही तर उर्फी जावेदने स्कर्टवर काहीही घातलेलं नाही. तिने फक्त छोटा कपडा चिकटवून वरील अंग झाकलं आहे.

तिचा लूक पूर्ण करण्यासाठी उर्फीने तिचे केस बांधले आहेत आणि उंच हिल्स देखील घातल्या आहेत. उर्फी हा ड्रेस परिधान करताना इतकी बोल्ड स्टाईल दाखवत आहे की, हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

परंतु उर्फी तिच्या या लूकमुळे भलतीच ट्रोल होऊ लागली आहे. अनेकांचं असं म्हणणं आहे की, ”आता हेच बघायचं राहिलं होतं. ” परंतु लोक काहीही बोलू देत उर्फी मात्र या लोकांकडे अजिबात लक्ष देत नाही आणि आपलं फॅशन एक्प्रिमेंट सुरुच ठेवते.Source link

Leave a Reply