आपली पहिली भेट…; सामन्यानंतर डेवाल्ड आणि विराट कोहलीचा व्हिडियो व्हायरल


मुंबई : शनिवारी मुंबई इंडियन्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूरू यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात बंगळूरूने मुंबईवर 7 विकेट्सने विजय मिळवला. दरम्यान या सामन्यात आऊट झाल्यानंतर चाहत्यांना पुन्हा एकदा विराटचा आक्रामकपणा पहायला मिळाला. डेवाल्ड ब्रेव्हिसच्या बॉलवर तो ज्या पद्धतीने आऊट झाला, त्यावर प्रश्न उपस्थित केले जातायत. यावेळी विराट कोहलीही संतापलेला दिसून आला. 

मात्र या सर्व प्रकारानंतर माजी कर्णधार विराट कोहलीने डेवाल्डचं कौतुक केलं आहे. याचा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

मुंबई इंडियन्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हा व्हिडीयो ट्विट केला आहे. या व्हिडीयोमध्ये विराट कोहली बेबी एबी डिव्हिलीयर्स म्हणजेच डेवाल्डशी बोलताना दिसतोय.

यावेळी विराट म्हणतो, खूप छान यंग मॅन. आपली पहिली भेट चांगली झाली. तू तर मला पहिल्याच बॉलमध्ये माघारी पाठवलंस. 

19व्या ओव्हर डेवाल्ड फेकत असताना त्याच्या पहिल्या बॉलवर विराट कोहलीने शॉट मारला. यावेळी बॉल पॅडवर लागताच डेवाल्डने जोरदार अपील केलं आणि ऑनफिल्ड अंपायर वीरेंद्र शर्मा यांनी विराटला आऊट करार दिला. विराटने क्षणाचाही विलंब न करता रिव्ह्यू घेतला आणि हातवारे करत चेंडू आणि बॅटचा संपर्क झाल्याचं सांगितलं. 

दरम्यान अल्ट्राएजमध्ये बॉल आणि बॅट यांच्यात काही संपर्क झाला होता की नाही हे योग्य पद्धतीने समजू शकलं नाही. त्यामुळे विराट कोहलीला आऊट देण्यात आलं. यानंतर संतापलेल्या कोहलीने रागाच्या भरात प्रथम मैदानावर बॅट आपटली. दरम्यान यावरून मोठा वाद होण्याचीही शक्यता आहे.Source link

Leave a Reply