‘आमच्या घरात…’ Shweta Tiwari नं सांगितला ‘तो’ थरारक अनुभव


Shweta Tiwari: टेलिव्हिजन क्षेत्रात अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) हे एक मोठं नाव आहे. बिग बॉसमध्येही श्वेतानं नावं कमावलं आहे. ती आपल्या प्रोफेशनल तसेच पर्सनल आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. सध्या श्वेता आपल्या परिवाराला चांगला वेळ देण्यात व्यस्त आहे. (actress shewta tiwari says her house is full with ladies therefore her house name is sita ka ghar)

अलीकडेच तिने खुलासा केला आहे की तिच्या घराला ‘सीता का घर’ (Sita Ka Ghar) असं लोकं म्हणतात. यासोबतच तिनं त्यामागचं कारणही सांगितलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत तिनं याबद्दल खुलासा केला आहे. 

श्वेतानं सांगितले की, तिच्या घराला ‘सीता का घर’ असं म्हणतात, ‘बर्‍याच जणांना हे माहीत नाही, पण आमच्या जवळ राहणारे सगळेच माझ्या घराला ‘सीता का घर’ म्हणून ओळखतात. ते ‘सीता का घर’ म्हणतात कारण आमच्या घरात महिलांची संख्या जास्त आहे. आई, माझी मुलगी, माझ्या घरात काम करणाऱ्या बायका. सर्वचजणी. आमच्यापैंकी प्रत्येकानं आपल्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या संकटाचा सामना केला आहे. मग तो नवरा असो, कुटुंब असो, मुली असो, काही ना काही घडले आहे.” असा खुलासा तिनं केला. 

श्वेता एका मीडिया चॅनलशी बोलताना म्हणाली की, “मला माझ्या मुलीसाठी फार वेळ देता आला नाही यासाठी कधीकधी मला फार अपराधी वाटतं. विशेषत: जेव्हा माझी मुलगी मोठी होत होती, त्या दिवसांत मला माझ्या मुलीची काळजी घेण्याची फारशी समज नव्हती. (Shweta Tiwari Daughter Palak Tiwari)

त्यावेळी मी खूप चांगल्या स्थितीत होतेच अशातला भाग नाही. त्यावेळी मी कामात खूपच व्यस्त होते मला वेळही फार कमी मिळायचा. मला जो काही वेळ मिळला असेल तो माझ्या वैयक्तिक आयुष्यातील इतर स्थितीमुळे वाया गेला असेल परंतु मी पलकला खूप कमी वेळ दिला आहे. कधी कधी दिलासा मिळतो की मी तिच्यासोबत आता चांगला वेळ घालवू शकते आहे.”Source link

Leave a Reply