Headlines

Aadhar Number: तुमचा आधार क्रमांक Fake तर नाही ,’असे’ करा चेक, फॉलो करा ‘या’ स्टेप्स

[ad_1]

नवी दिल्ली: Verify Aadhar Number: आधार क्रमांक नागरिकांसाठी किती महत्वाचे आहे. हे, वेगळे सांगायची गरज नाही ओळखीचा पुरावा आणि रहिवाशाचा पुरावा असण्याव्यतिरिक्त, सरकारने आणलेल्या विविध योजनांतर्गत लाभ मिळवण्यासाठी देखील Aadhar Card चा वापर केला जातो. याशिवाय रेशनकार्ड, पासपोर्ट आणि पॅन कार्ड यांसारखी सरकारी अधिकृत कागदपत्रे मिळविण्यासाठीही आधार क्रमांक आवश्यक आहे. त्यामुळे, ओळखीचा पुरावा म्हणून आधार क्रमांक स्वीकारणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना त्याची सत्यता सहज पडताळता येणे महत्त्वाचे आहे. आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने दोन सोप्या पद्धती सांगितल्या आहेत. ज्याद्वारे व्यक्ती आणि संस्था आधार क्रमांक खरा आहे की बनावट आहे हे ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही तपासू शकतात. पद्धत जाणून घेऊया.

वाचा: Smartphone Deals: स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी पाहा ही लिस्ट, या फोन्सवर मिळतोय तब्बल ७,००० रुपयांपर्यंत ऑफ

आधार क्रमांक खरा आहे की बनावट याची ऑनलाइन पडताळणी कशी करावी? ऑनलाइन चॅनेलद्वारे आधार क्रमांकाची सत्यता पडताळण्यासाठी, तुम्हाला या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

सर्वप्रथम आधार धारकाचा आधार क्रमांक टाका. कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि ‘verify Aadhar ‘ बटणावर क्लिक करा. एकदा ते केल्यावर तुम्हाला कळेल की आधार क्रमांक Fake आहे की नाही. याशिवाय, याच्या मदतीने तुम्हाला वय, लिंग, राज्य आणि आधार धारकाच्या मोबाईलचे शेवटचे ३ अंक यासारखे तपशील देखील कळतील.

आधार क्रमांक खरा आहे की खोटा याची पडताळणी कशी करावी (ऑफलाइन मोड): ऑफलाइन चॅनेलद्वारे Aadhar Number Verification साठी, या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

कार्डधारकाच्या आधार कार्डावरील QR कोड स्कॅन करा. असे केल्याने तुम्हाला कळेल की आधार क्रमांक खरा आहे की नाही. UIDAI युजर्ससाठी अतिरिक्त चेक म्हणून ‘आधार’ पडताळण्याची शिफारस करते, उदाहरणार्थ, कर्मचारी, घरगुती कामगार, ड्रायव्हर किंवा भाडेकरू. UIDAI ने Android आणि iOS वर आधार अॅपसाठी अपडेट देखील जारी केले आहे. अपडेटमध्ये, लोकांना पुश नोटिफिकेशन्स, सर्व request status पाहण्यासाठी ‘माय रिक्वेस्ट’ आणि इतर गोष्टींबरोबरच ऑनलाइन Demographic Updates मिळतात.

वाचा: AC Tips: बजेटच्या अडचणीमुळे सेकंड हँड AC खरेदी करणार असाल तर ‘या’ गोष्टी नक्की चेक करा, पाहा टिप्स

वाचा: Best Plans: फक्त २ रुपये रोज खर्चून मिळेल ३९५ दिवसांची व्हॅलिडिटी, डेली २ GB डेटा आणि फ्री कॉल्स, पाहा ‘हा’ युनिक प्लान

वाचा: Budget Plans: प्रत्येक युजर्ससाठी बेस्ट आहे Jio चे ‘हे’ ३ भन्नाट प्लान्स, ३०० रुपयांपेक्षा कमीमध्ये ५६ GB पर्यंत डेटा-कॉलिंगसह मिळतात ‘हे’ फायदे

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *