Headlines

आधार-मोबाईल लिंकींगसाठी विशेष शिबीर

सोलापूर : जिल्ह्यातील शासनाच्या विविध डीबीटी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना त्वरित लाभ मिळणेसाठी आधार अद्ययावतीकरण, आधारसोबत मोबाईल नंबर लिंक करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सोलापूर विभाग व पंढरपूर विभाग यांच्या अधिनस्त सर्व पोस्ट ऑफिसमध्ये 23 ते 25 सप्टेंबर 2021 या कालावधीत तीन दिवसीय आधार-मोबाईल लिंकींग विशेष शिबीर राबविण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा आधारच्या नोडल अधिकारी शमा पवार यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.

विविध शासकीय योजनेंतर्गत पात्र लाभार्थी यांना थेट लाभ मिळण्यासाठी डीबीटी ही प्रणाली राबविली जाते. प्रणालीमध्ये शासनामार्फत लाभ हा थेट लाभार्थी यांच्या आधार संलग्न खात्यामध्ये मिळणे अपेक्षित आहे. परंतु काही योजनेच्या लाभार्थ्यांचे आधारवरील नाव चुकीचे असणे, मोबाईल नंबर लिंक नसणे किंवा बँक खाते आधारशी जोडलेले नसणे, यामुळे त्यांना डीबीटीमार्फत लाभ मिळण्यास विलंब होत आहे.

पीएम किसान योजना, शिष्यवृत्ती, एमआरईजीएस या डीबीटी योजनेतील लाभार्थ्यांनी शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीमती पवार यांनी केले आहे.

सोलापूर विभागअंतर्गत पोस्ट ऑफिस- सोलापूर मुख्यालय, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, दाजी पेठ, सोलापूर सिटी, सोलापूर मार्केट, इंदिरानगर, मंगळवार पेठ, एमआयडीसी, मेडिकल कॉलेज, नवी पेठ, जीएनपीओ, अशोक चौक, सिध्देश्वर पेठ, शिवशाही, मंद्रुप, नान्नज, वैराग आणि पंढरपूर विभाग अंतर्गत पंढरपूर मुख्यालय, अकलूज, सांगोला, माढा, कुर्डुवाडी, करमाळा, मंगळवेढा, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, श्रीपूर, टेंभूर्णी, मोडनिंब, करकंब, जेऊर, पिलीव, महूद, नवी पेठ, आधार लॅपटॉप किट याठिकाणी आधार लिंकिंग करून मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *