Breaking News

12 डिसेंबरला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

सोलापूर: सामान्य जनतेमध्ये कायद्याबाबत जनजागृती होण्यासाठी आणि पक्षकारांची प्रकरणे तडजोडीने मिटविण्यासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या सूचनेनुसार दि.12 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 10.30 वाजता सोलापूर शहर व तालुक्यात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा  प्राधिकरणाचे अध्यक्ष एम.आर. देशपांडे यांनी दिली.

जिल्ह्यातील सर्व न्यायालयात फौजदारी तडजोडपात्र,बँक वसुली, कलम 138 एन. आय. ॲक्ट, अपघात न्यायाधिकरणाबाबत, कामगार वाद, वीज व पाणी यांची देयके, वैवाहिक वाद, भूसंपादन, बँक, सहकारी बँक, सहकारी  पतसंस्था यांच्या वसुलीबाबत, बँक लवाद इत्यादी प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांबाबत राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्याय दिला जाणार आहे.

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त पक्षकारांनी प्रकरणे तडजोडीने मिटवून लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री.देशपांडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!