Headlines

सोयाबीन पिवळे पडण्याची संभाव्य कारणे व उपाय



सध्या अनेक भागात पाऊस पडल्याने सोयाबीन सह उडीद , मूग ,तूर पिकांमध्ये पाणी साचून राहते. त्यामुळे पिकावर वेगवेगळे रोग पडत.त्याचाच एक भाग म्हणजे सोयाबीन पिवळे पडणे ,याची कारणे व उपाय खालील प्रमाणे – 

सोयाबीन पिवळे पडण्याची संभाव्य कारणे:

१. सततचा पाऊस 
२. शेतात पाणी साचून राहणे, 
३. ज्यास्त दिवस ढगाळ वातावरण
४. दिवसाचे अधिक तापमान
५. अन्नद्रव्यांची कमतरता
६. रस शोषक किडींचा प्रादुर्भाव (पांढऱ्या माशीमुळे यलो मोसाईक या विषाणूजन्य रोगाचा प्रसार होतो)
७. खोडमाशी, चक्रभुंगा किडीचा प्रादुर्भाव
लक्षणानुसार योग्य उपाययोजना कराव्यात:

१. शेतात पाणी साचू देऊ नये. साचले असेल तर नाली तयार करून पाणी शेताबाहेर काढून घ्यावे.
२. पिवळे चिकट सापळे १० प्रति एकरी या प्रमाणात लावावेत.
३. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी शिफारस केलेल्या आंतरप्रवाही कीडनाशकाची फवारणी करावी.
४. सोयाबीन पिकाचे पाने पिवळी झालेली व पानाच्या शिरा हिरव्या असल्याचे दिसून येत असतील तर सदर प्रकार लोह या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे दिसून येतो त्यावर उपाय म्हणून, त्वरीत ५० ग्राम फेरस सल्फेट + २० ग्राम झिंक सल्फेट + २५ ग्राम खाण्याचा चुना १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे.
५. सोयाबीन पिकामध्ये खोड माशी व चक्रभुंगा किडीचा प्रादूर्भावा आढळल्यास इथिऑन ५०% इसी कीडनाशक १५ ते ३० मिली (प्रदूर्भावाची तीव्रता लक्षात घेऊन) किंवा क्लोरणट्रनिलिप्रोल १८.५ % एससी ३ मिली या पैकी कोणतेही एक किडनाशक प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
६. रासायनिक किडनाशकांची, बुरशीनाशकाची एकत्रितपणे फवारणी करू नये.
७. फवारणी करतांना योग्यती  सुरक्षेची काळजी घेऊनच फवारणी करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *